५१ फुटी प्रतिकात्मक रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:40 PM2019-10-08T23:40:00+5:302019-10-08T23:40:30+5:30

येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला.

2 Foot symbolic Ravana combustion | ५१ फुटी प्रतिकात्मक रावणाचे दहन

५१ फुटी प्रतिकात्मक रावणाचे दहन

Next
ठळक मुद्देखंडेश्वरी नवरात्रोत्सव : १५० ते ३०० फुटांपर्यंत उंच विविध तेजोमय रंगाची उधळण

बीड : येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला.
२९ सप्टेंबरला घटस्थापनेने शहराची ग्रामदेवता श्री खंडेश्वरी देवी संस्थानच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. तीन दिवसीय नवचंडी यागाची सोमवारी सांगता झाली. मंगळवारी पहाटे ४ वाजता ब्रह्ममुहुर्तावर विजयादश्मीची महापूजा झाली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजाता सीमोल्लंघन, आतषबाजी आणि रावण दहनाचा कार्यक्रम झाला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता व नंतर मातेची महापूजा अभिषेक, महाआरती हे कार्यक्रम होणार आहेत.
आतषबाजीचा थाट
ग्रीन फटाक्यांची संकल्पना लक्षात घेत यावर्षी बीडकरांना नेहमीपेक्षा आगळीवेगळी आतिषबाजी पहायला मिळाली. आकाशात १५० ते ३०० फुटांपर्यंत उंच विविध तेजोमय रंगाची उधळण करणारी आतषबाजी लक्षवेधी ठरली.
मोर पिसाऱ्याप्रमाणे दिसणारे रंग, शिटीचा ध्वनी ऐकवित विविध रंगातील इलेक्ट्रीक कोल्ड फटाके आनंदाची उधळण करत होते.
लोखंडी अ‍ॅँगलचा वापर करुन रावण प्रतिकृती तयार करण्यात आली. यात कपडे, पोते, कडबा, शोभेची दारु व इतर साहित्याचा वापर करण्यात आला होता.

Web Title: 2 Foot symbolic Ravana combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.