शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मदतीसाठी पोलिसांना ११२ वर वर्षभरात १७ लाख कॉल; पोलिस आले ६.३६ मिनिटांत

By सोमनाथ खताळ | Updated: March 25, 2025 18:14 IST

मीरा भाईंदरमध्ये अडीच मिनिटांत मदत तर मुंबई शहरात लागला २१ मिनिटांचा वेळ

बीड : वेगवेगळ्या अडचणीत सापडलेल्या सामान्य लोकांनी डायल ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. त्यानंतर पोलिस अवघ्या ६.३६ मिनिटांत पोहोचल्याचे समोर आले आहे. यावरून यंत्रणा सक्षम असल्याचे दिसते. मीरा भाईंदरमध्ये अवघ्या अडीच मिनिटांत पोलिसांनी मदत केली तर मुंबई शहरात मदतीसाठी पोलिसांना तब्बल २१ मिनिटांचा वेळ लागला आहे. २०२४ या वर्षात १७ लाख २५ हजार लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाईन सुरू झाली होती. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात याची ट्रायल घेण्यात आली होती.

पोलिसांकडे एमडीटी मशीन अन् वाहनेप्रत्येक पोलिस ठाण्यात डायल ११२ साठी स्वतंत्र यंत्रणा आहे. एका ठाण्यात किमान ५ ते २० एमडीटी मशीन (मोबाईल डेटा टर्मिनल) आणि दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉल येताच हे लोक घटनास्थळी धाव घेतात.

काॅलचे लोकेशनही समजते११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते. विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा लवकर मदत मिळत आहे.

फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाईकाही टवाळखोरांसह लहान मुले हे टाईमपास म्हणून ११२ वर कॉल करून खाेटी माहिती देतात; परंतु पोलिस तरीही जाऊन खात्री करतात. खोटे असल्याचे समजताच गुन्हा दाखल करतात यापूर्वी बीडमध्ये एका अल्पवयीन मुलाने आजीच्या फोनवरून कॉल करून शाळेत बाॅम्ब असल्याची माहिती दिल्याने यंत्रणेची धावपळ झाली होती. यात संबंधितांवर कारवाई केली होती.

नाली तुंबली, पाणीच येईनाया हेल्पलाईनवर काही लोक पोलिसांच्या संबंधित नसणाऱ्याही तक्रारी करतात. जशा की आमच्या नळाला पाणी येईना, नाली तुंबली, घंटागाडी येईना आदींचा समावेश आहे.

बायको जेवायलाच देईनाकाही दारूड्यांनी तर घरात बायको जेवायला देत नाही, मला घरी जायला वाहनच नाही, अशाही तक्रारी केल्या. बायको माहेरी गेली, आता परत येईना, अशाही तक्रारी आल्याचे सांगण्यात आले.डायल ११२ ही हेल्पलाईन सामान्यांसाठी खूप आधार देणारी ठरत आहे. बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस मदतीसाठी २४ तास तत्पर असतात. कॉल येताच मदतीसाठी आमचे पथक जाते. तक्रार खरी, खोटी हा नंतरचा भाग आहे. आम्ही दुर्लक्ष करत नाही.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

अशी आहे आकडेवारी जिल्हा - आलेले काॅल - मदतीची वेळमीरा-भाईंदर - ७९७१६ - २.३७छत्रपती संभाजीनगर ग्रामीण - २३२३ - २.५६ठाणे शहर - १४५८४६ - ४.४१धुळे - १३५९५ - ५.७धाराशिव - १७२८१ - ५.११परभणी - १४६६५ - ५.१८नागपूर ग्रामीण - २११७४ - ५.२२छत्रपती संभाजीनगर शहर - ४८००२ - ५.२७नाशिक शहर - ५३७९० - ५.३२ठाणे ग्रामीण - १२७२९ - ५.४०नवी मुंबई - ९३५६२ - ५.४६गोंदिया - ८५२६ - ५.५०सातारा - २८०२२ - ५.५३पुणे शहर - २२१६८३ - ५.५७पुणे ग्रामीण - ६१३२१ - ५.५७बुलढाणा - १७०८७ - ६.१५पिंपरी चिंचवड - १२०६३७ - ६.१८कोल्हापूर - ३०८३३ - ६.३३पालघर - ११५४३ - ६.५९नागपूर शहर - १२५६१० - ७.०५अमरावती शहर - २२०३१ - ७.११रायगड - १६८७७ - ७.२१गडचिरोली - ४२११ - ७.२५सोलापूर ग्रामीण - ३२४९७ - ७.२५हिंगोली - ९९७६ - ७.२९वाशिम - १३५१२ - ७.३४बीड - २२२०० - ७.५३सोलापूर शहर - २२७२२ - ८.४नांदेड - २८६५९ - ८.२३चंद्रपूर - २०३१५ - ८.३०लातूर - ३११२० - ८.३०अमरावती ग्रामीण - १८१४० - ८.३८यवतमाळ - १८५०३ - ९.००रत्नागिरी - ५८२७ - ९.५अकोला - १५१०८ - ९.१४जालना - १८४४० - ९.१५नंदुरबार - ४३८४ - ९.४४जळगाव - २३४५५ - १०.३सांगली - ३१९२२ - १०.३सिंधुदुर्ग - ३९५० - १०.१०वर्धा - १४७९६ - १०.१५अहिल्यानगर - ४९०२६ - १०.१९नाशिक ग्रामीण - २८५०२ - १०.३३भंडारा - ८४१० - ११.००मुंबई शहर - १०४०७७ - २१.५०एकूण - १७२५७०८ - ६.३६

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस