शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Video: १५० वर्षांची अनोखी परंपरा; धुलीवंदनानिमित्त मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:39 IST

बीड जिल्ह्यात १५० वर्षांची अनोखी परंपरा; ग्रामस्थांनी धुलीवंदनाला मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक

- मधुकर सिरसट / विनोद ढोबळे विडा :( ता केज ): बीड जिल्ह्यात १५० वर्षांची एक अनोखी परंपरा गावकरी आजही पाळत आहेत. केज तालुक्यातील विडा येथील मानकरी जावयास रंग लावून आज धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून मिरवणूक काढली जाते 150 वर्षाच्या परंपरेचे यंदाचे मानकरी जावई म्हणून जवळबन येथील अविनाश करपे यांची विडेकरांनी निवड केली. ते जवळबन येथे झोपेत असतानाच सोमवारी मध्यरात्री 2 वाजता निवड समितीने त्यांना ताब्यात घेतले.

विडा येथील जावयाची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून ढोल, ताशा, आणि डीजे च्या तालावर गावातून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे धुलिवंदनाची चाहूल लागताच विडेकरांचे सर्व जावई आपले मोबाईल स्विचऑफ़ करून भूमिगत होतात. दरम्यान, तीन दिवसांपासून विडेकरांनी नेमलेली समिती मानकरी जावयाच्या शोधात होती. अखेर सोमवारी रात्री 2 वाजता जवळबन येथून झोपेत असताना जावई अविनाश करपे यांना ताब्यात घेण्यात आले. लागलीच त्यांना मोठ्या सन्मानाने गावात आणण्यात आले. त्यांना रंग लावून गाढवावर बसवत विडा गावातून मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, मिरवणुकीनंतर जावयाला नवीन कपड्याचा आहेर व सासरच्या मंडळीकडून सोन्याची अंगठी देण्यात आली.

150 वर्षाची परंपरादीडशे वर्षांपूर्वी थट्टा मस्करी मधून विडा येथील आनंदराव देशमुख यांनी आपल्या जावयाला गाढवावर बसवून गावातून मिरवले होते. याचेच रूपांतर नंतर दरवर्षी गावच्या जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्यात झाले. तेथूनच या रूढी परंपरेला प्रारंभ झाला.ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही म्हणून गावकरी दरवर्षी गावच्या जावयाचा शोध घेत त्याची गाढवावरून मिरवणूक काढतात. 

टॅग्स :Holiहोळी 2023Beedबीड