शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

मुंबईला जाण्यास नकार दिल्याने एस.टी.चे 14 कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:31 IST

ST News : जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहक, चालकांना मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी जबरदस्तीने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.

- संजय खाकरे  परळी (जि. बीड) :  जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहक, चालकांना मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी जबरदस्तीने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, बसवाहक व चालकांनी मुंबईत बेस्ट ड्यूटीसाठी जाण्यास नकार दिल्याने परळी आगारातील १४ बसचालक- वाहकांना  शनिवारी निलंबित केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या कारवाईमुळे परळीतील बसवाहक- चालक हादरून गेले आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात येत आहे. परळी एसटी  आगारात ३५४ कर्मचारी असून, या सर्वांना बेस्ट सेवेसाठी मुंबईला आतापर्यंत पाठविण्यात आले आहे.  मुंबईला गेलेले अनेक कर्मचारी ड्यूटी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. आपण मुंबईला ड्यूटी केल्यानंतर दोन वेळा पॉझिटिव्ह आल्याचे रापम कर्मचारी विश्‍वनाथ जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईत  बेस्टच्या सेवेसाठी जाण्यास नकार देणाऱ्या परळी येथील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  काढले आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन   कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडली. यावेळी उत्तम मोरे, दयानंद गीते, मोहन गीते, गोपीनाथ मुरकुटे, प्रदीप, विश्वनाथ जाधव, विष्णू सातभाई उपस्थित होते.  

सुरळीतपणा आणण्यासाठी नाइलाजास्तव कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढावे लागले. कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचा भाग  म्हणून ड्यूटी करावी.-प्रवीण भोंडवे, आगारप्रमुख, परळी जीव धोक्यात घालून कोण जाणार? मुंबईत कोरोनाचा कहर चालू आहे. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून बीड जिल्ह्यातून आम्ही जावे कसे? याची जबाबदारी कोण घेणार?  असा प्रश्न एसटी कामगार सेनेचे परळी शाखेचे सचिव मोहन गीते यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील एस.टी. कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात येत नाही. मग बीड जिल्ह्यातीलच एसटीचे वाहक, चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी का पाठवले जाते?  असा सवालही गीते यांनी केला.  लस दिली नाहीnएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लसही दिली नाही. मुंबईहून आल्यानंतर स्वतःहून  टेस्ट करावी लागत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कुठलेही नियोजन केले नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी मात्र, तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

टॅग्स :state transportएसटीBeedबीड