शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १०२ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:42 IST

बीड : गेल्या हंगामातील कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.जिल्ह्यातील शेतक-यांना २५६ कोटी अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता ६८ कोटी रूपयांचा शेतक-यांना वाटप करण्यात आला आहे. तर दुसरा हप्ता १०२.६४ कोटी रूपये बँकेमध्ये जमा करण्यात आला आहे.बोंडअळीचे अनुदान सरसकट मिळण्यासाठी मोठे आंदोलन जिल्हाभरात उभारण्यात ...

बीड : गेल्या हंगामातील कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.जिल्ह्यातील शेतक-यांना २५६ कोटी अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता ६८ कोटी रूपयांचा शेतक-यांना वाटप करण्यात आला आहे. तर दुसरा हप्ता १०२.६४ कोटी रूपये बँकेमध्ये जमा करण्यात आला आहे.

बोंडअळीचे अनुदान सरसकट मिळण्यासाठी मोठे आंदोलन जिल्हाभरात उभारण्यात आले होते. त्यानुसार २५६ कोटी अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यापैकी पहिला हप्ता ६८ कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यानंतर ुउर्वरित अनुदानाच्या रकमेसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मागणी केली होती, त्यानुसार १०२.६४ कोटी रक्कम बँकेत जमा झाली आहे. अनुदानाची रक्कम पुढील काही दिवसात शेतक-यांनच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

पहिला हप्ता मिळाल्यानंतर पुढील दोन्ही हप्त्यांची रक्कम एकाच टप्प्यात देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकºयांनी केली होती.

तीन टप्प्यात प्रत्येकी ८५ कोटी येणार होेते. त्यापैकी पहिला हप्ता फक्त ६८ कोटी आले, दुसरा हप्ता येण्यास दीड महिना वेळ लागला असून पहिल्या हप्त्यातील १७ कोटी रक्कम दुस-या हप्त्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. बँकांमध्ये जमा झालेले १०२ कोटी कुठलीही कपात न करता शेतकºयांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासने दिले आहेत. तिस-या टप्प्यातील ८६ कोटी रुपये अनुदान लवकरच खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी शेतकºयांमधून पुढे येत आहे.१ लाख ६१ हजार शेतक-यांना मिळाले अनुदानसंपूर्ण जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांची संख्या ६ लाख ९२ हजार ३८ एवढी आहे.बोंडअळी अनुदानाची पहिल्या टप्प्यातील ६८.२३ कोटी रक्कम १ लाख ६१ हजार ३६२ शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.उर्वरित जवळपास साडेचार लाख शेतकरी बोंडअळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.बँकांनी कुठलीही कपात न करता अनुदानाची संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.शेतक-यांत नाराजीचा सूरबीड जिल्ह्यात गतवर्षी ३ लाख ७८ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती. कापूस पिकावरच जिल्ह्यातील शेतक्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, कापूस वेचणीवेळी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे येणारा उतारा कमी प्रमाणात आला. काही ठिकाणी तर लागवड खर्चही निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. बोंडअळी अनुदान खरीप पेरण्यापूर्वी देण्याची मागणी झाली होती. मात्र, शासनाकडून अनुदान देण्यास विलंब झाल्यामुळे शेतकºयांमध्ये पैसे मिळून देखील नाराजीचा सूर दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा