(Image Credit : Skymet Weather)
असं नेहमीच म्हटलं जातं की, पाऊस वेगवेगळे आजार सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात आरोग्यासोबत सौंदर्यासंबंधीही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यात सर्वात जास्त समस्या होते ती केसांना. पावसाच्या पाण्यातील प्रदूषित तत्त्व केस कमजोर करतात. त्यामुळे या दिवसात केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं ठरतं.
या दिवसात केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एकतर खोबऱ्याचं तेल लावणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. सोबतच केसांनुसार शॅम्पूचा वापर करा. चला आणखीही काही उपाय जाणून घेऊया.
हेअर स्टायलिंग प्रॉडक्टचा वापर कमी करा
पावसाच्या दिवसात स्टायलिंग प्रॉडक्टचा वापर कमी करावा. कारण या दिवसात याचा वापर केल्यास केसांचं नुकसान होऊ शकतं. यात वेगवेगळे केमिकल्स असतात. ज्यामुळे केस रखरखीत आणि निर्जीव होतात.
केस कोरडे ठेवा
पावसाच्या दिवसात केस कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण या दिवसात पावसात केस अनेकदा भिजतात. पण सतत केस भिजलेले असल्याने केसांचं नुकसान होतं. तसेच केस भिजलेले असल्याने डोक्याची त्वचाही नाजूक होते आणि केसगळतीची समस्या होते. तसेच पावसाच्या पाण्यात जर केस भिजले तर घरी जाऊन स्वच्छ पाण्याने पुन्हा केस धुवावे आणि चांगले कोरडे करावे. याने केस चांगले राहतील.
केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करा
पावसाळ्यात वातावरणामुळे केस कमजोर आणि निर्जिव होतात. डॅंड्रफमुळे केसांचं मूळ कमजोर होतं. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा या दिवसात जास्त केस गळतात. या दिवसात केसांना कोणत्याही प्रकारचा हेअर जेल आणि कंडीशनर लावू नये. अशात केसांना केमिकल फ्री मेहंदी लावणं चांगलं असतं.
आहारावर द्या लक्ष
प्रोटीन हे निरोगी केसांसाठी महत्त्वपूर्ण पोषक तत्त्व आहे. तुम्हाला जर तुमचे केस चमकदार आणि सुंदर हवे असतील तर रावस मासे, अंडी, गाजर, कडधान्य, हिरव्या भाज्या, किडनी बीन्स, बदाम आणि लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स सेवन करा.
नियमितपणे कंडीशनिंग करा
अनेकदा पावसाच्या दिवसात काही लोकांचे केस ड्राय होतात. ज्यामुळे केस तुटू लागतात. यामुळे नियमितपणे केसांना कंडीशनिंग करत रहा. याने केसांना चमक मिळते.