कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख वेगवेगळ्या गोष्टींसोबत त्याची हेअरस्टाइलही ठरू शकते. सलूनमध्ये जाऊन कशाही प्रकारे केस कापून येण्याला खरंतर काही अर्थ नाही. कारण याने तुमचं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं. अशात कोणतीही हेअरस्टाइल करताना तुम्ही पुरेसा विचार करणं गरजेचं आहे. हेअरस्टाइल निवडताना तुमच्या चेहऱ्याचा आकार लक्षात घ्या आणि त्यानुसार हेअरस्टाइलचं सिलेक्शन करा. लांब चेहऱ्यासाठी कोणत्या हेअरस्टाइल चांगल्या दिसतील याचे काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
बॅंग्स
जर तुमचा चेहरा लांब असेल तर बॅंग्स हेअरस्टाइलपेक्षा चांगली दुसरी हेअरस्टाइल असूच शकत नाही. याने चेहऱ्याचा मुख्य भाग असलेला माथा झाकला जातो. ज्याने चेहरा छोटा आणि चांगला दिसतो.
वेवी हेअरकट
जर तुमचे केस लांब असतील तर ते वेवी स्टाइलमध्ये कट करू शकता. लांब केसांवर स्टेप कट करा आणि तुमचा लूक हटके बनवा.
लॉंग बॉब
लॉंग बॉब हेअरस्टाइल सुद्धा लांब चेहऱ्यासाठी परफेक्ट मानली जाते. यात कटमध्ये मागचे केस समोरच्या तुलनेत एक किंवा अर्धा इंच छोटे असतात. सध्या ही हेअरस्टाइल ट्रेन्डमध्ये आहे.
चिन लेंथ बॉब
चिन लेंथ बाब या हेअरस्टाइलमुळे तुमचे केस दाट दिसतील आणि त्यात बाउंसही दिसेल. केसांमध्ये बाउंस येण्याचा अर्थ हा आहे की, तुमचे केस चांगले आहेत आणि याप्रकारच्या हेअरकटने चेहरा चांगला दिसेल.
लॉंग लेअर्स
लांब चेहरा असेल तर लॉंग लेअर्स हेअरकटमुळे चेहरा भरलेला दिसतो. पण हे लेअर्स छोटे छोटे असतील याची काळजी घ्यावी. याने चेहरा लांब दिसणार नाही.
फ्रिंज स्टाइल
जर तुमचं कपाळ फार रूंद असेल आणि तुम्हाला तो लपवायचा असेल तर लांब केसांमध्ये फ्रिंज करा. याने तुम्ही सुंदर तर दिसायला लागाल.