शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

थंडीच्या दिवसात तोंडावर वाफ घेण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर त्वचेसह आरोग्याच्या तक्रारी कायमच्या विसराल 

By manali.bagul | Published: December 17, 2020 3:12 PM

Beauty Tips in Marathi : थंडीच्या दिवसात सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तसंच घश्याच्या समस्येसाठी लोक गरम पाण्याची वाफ घेतात.

वातावरणातील बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आजारपणाची जास्त भीती सगळ्यांनाच वाटते. कारण ११ महिन्यानंतरही कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबलेला नाही. कोरोनाकाळात तब्येत चांगली राहण्यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. पोषक आहार,  काढा पिणं, हळदीचं दूध, गरम कपडे, वाफ घेणं या उपयांचा अवलंब केला जात आहे. 

थंडीच्या दिवसात सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तसंच घश्याच्या समस्येसाठी लोक गरम पाण्याची वाफ घेतात. तर काहीजण त्वचेची काळजी घेण्यासाठी मसाज करण्याआधी वाफ  घेतात. आज आम्ही तुम्हाला वाफ घेतल्याने शरीराला होणारे फायदे आणि वाफ घेण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.

वाफ घेण्याची योग्य पद्धत

१) तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात ३ ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा.

२) हे ५-१० मिनिटे गरम होऊ द्या. यानंतर डोक्यावर एक कॉटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकण काढून ५ ते १० वाफ घ्या. वाफ घेताना तोंडाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या. 

३) आढवड्यातून दोन ते तीनवेळा ही पद्धत रिपीट करा. 

फायदे

थंडीच्या दिवसात चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून आराम मिळतो. हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा मऊ होते. चेह-यावरील त्वचेवर चकाकी येते तसंच चेह-यावर आलेले डेड सेल्स नाहीसे होतात आणि चेह-यावरील त्वचा मोकळी होते. रोज वा आठवड्यातून २-३ दिवस चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेची घाण दूर होते. पिंपल्स प्रॉब्लेम नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काळ्या डागांनी चेहऱ्याचा लुक बिघडलाय? ग्लोईंग, आकर्षक त्वचेसाठी एक्सपर्ट्नी दिले ७ सोपे घरगुती उपाय

वाफ घेतल्यानं  धुळ, प्रदूषणावर चेह-यावर चिकटलेली घाण स्वच्छ होते आणि चेह-याला ग्लो येतो. नियमित गरम वाफ घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो. नाक चोंदले असल्यास गरम वाफ नाकात जाऊन नाक मोकळे होते आणि श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहते. वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते. घरच्याघरी वाफ घेतल्याने विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुटका मिळते. 

ना पार्लरचं टेंशन, ना खर्चाची कटकट; घरच्याघरी केळ्याच्या वापराने 'अशी' मिळवा सुरकुत्यांपासून सुटका

स्टीम घेतल्यानंतर एक -दोन दिवसानंतर पिंपल्सने भरलेला चेहरा थोडा खराब वाटू शकतो. पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ दिसू लागतो. थंडीत अनेकजणांची त्वचा  कोरडी होते. अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन चेहऱ्याची चमक वाढते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स