(Image Credit : lifealth.com)
डाळिंबाच्या आरोग्यादायी फायद्यांबाबत तुम्हाला चांगलंच माहीत असेल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, डाळिंबाची सालही अनेक दृष्टीने फायदेशीर असते. जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर डाळिंबाची साल कधीही फेकू नका. ही साल जमा करा आणि उन्हात वाळवा. कारण याने त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या सहज दूर करू शकता. त्वचा सुंदर करू शकता. चला जाणून घेऊ अॅटी-ऑक्सीडेंट्सने भरपूर असलेल्या डाळिंबाच्या सालीचे सौंदर्यासाठी होणारे फायदे...
त्वचा मॉइश्चराइज करतात
डाळिंबाच्या सालीमध्ये इलेजिक अॅसिड आढळतं. हे एक असं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे त्वचेच्या पेशींना रिपेअर करतं आणि त्वचेत नैसर्गिक मॉइश्चरायजर कायम ठेवतं. तसेच डाळिंबाची साल त्वचेला हायड्रेट ठेवते आणि रखरखीतपणापासून बचावही करते.
सुरकुत्या दूर करते
डाळिंबाच्या सालीचा वापर त्वचेतील कोलेजनला तोडणाऱ्या एंजाइम्सला रोखतात. त्यासोबतच त्वचेच्या पेशींचा विकास करण्यासही मदत करतात. ज्यामुळे वय वाढल्याची लक्षणे जसे की, सुरकुत्या, फाइन लाइन्स, डार्क सर्कल इत्याही कमी होता.
पिंपल्स दूर होतात
डाळिांबाच्या सालीमध्ये हीलिंग प्रॉपर्टीज असते, ज्याने पिंपल्स, पुरळ आणि त्वचेवर आलेले रॅशेज कमी करण्यास मदत मिळते. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट बॅक्टेरिया आणि इतर इन्फेक्शनपासून त्वचेची सुरक्षा करतात.
सूर्याच्या किरणांपासून सुरक्षा
डाळिंबाची साल तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रीनसारखी काम करते. याच्या वापराने सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेची सुरक्षा होते. त्यामुळे त्वचेवर काळे डागही पडत नाहीत.
कसा करावा वापर?
डाळिंबाची साल उन्हात वाळवून सालीची ग्राइंडरमधून पावडर तयार करा. २ ते ३ चमचे पावडर घेऊन त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तशीच राहू द्या. १५ मिनिटांनंतर चेहऱ्याची हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
(टिप : वरील लेखातील सल्ले आणि उपाय हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण सर्वांनाच हे सूट होईल असं नाही. काहींना याची अॅलर्जी सुद्धा असू शकते.)