(Image Credit : www.bhg.com.au)
प्रत्येकालाच वय वाढलं तरी तरूणच दिसायचं असतं. नेहमी तरूण आणि फिट दिसण्याची इच्छा महिलांमध्ये अधिक असते. काही महिला तर त्यांचं वय लपवतात किंवा कमी सांगतात. काही लोक असे असतात जे त्यांच्या खऱ्या वयापेक्षा अधिक मोठे वाटतात. तर काही लोकांच्या त्वचेवर सुरकुत्या, डाग दिसू लागतात. त्यामुळे ते कमी वयातच वृद्ध वाटू लागतात. तुमच्या बाबतही असंच झालं आहे का? त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली आहेत, तर वेळीच सावध व्हा. तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन तरूण दिसू शकाल आणि आयुष्यही वाढवू शकाल.
झोप फार महत्त्वाची
दिवसभर काम करून, धावपळ करून शरीर थकतं. शरीराला मानसिक रूपानेही आरामाची गरज असते. जर तुम्ही रोज केवळ ५ ते ६ तास झोप घ्याल तर शरीराला व्यवस्थित आराम मिळणार नाही. तसेच तुमचा दुसरा दिवसही तणावातच जाईल. तणावाचा थेट प्रभाव मनावर आणि शरीरावर पडतो. जास्त तणावामुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागते. त्यामुळे रोज रात्री किमान ७ तास झोप घ्यावी.
दिनचर्या
कमी वयातच वृद्ध दिसायचं नसेल तर आधी तुमच्या सवयी बदलायला हव्यात. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, योग्य आहार घ्या आणि नियमित एक्सरसाइज करा. रोज फिरायला जावे. याने त्वचा तरूण दिसेल.
आळस करू नका
शरीराच्या क्रिया व्यवस्थित करण्यासाठी आळस अजिबात करू नका. दिवसबर बसून राहू नका. याने शरीरातील मांसपेशी लवचिक होणार नाहीत. काम करत राहिल्याने, शरीराची हालचाल होत राहिल्याने शरीरात ताजेपणाचा अनुभव होतो.
रात्री कॉफी घेऊ नका
कॉफीचं सेवन केल्यानेही तुम्ही अनेक वर्ष तरूण दिसू शकता. कारण यातील तत्व त्वचेवर सकारात्मक प्रभाव करतात. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिणे टाळावे. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही कॉफीचं सेवन केलं तर याचा झोपेवर नकारात्मक प्रभाव पडेल. लवकर झोप लागणार नाही. झोप न झाल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी फार थकवा जाणवेल, ऊर्जा कमी जाणवेल. त्यामुळे झोपण्याआधी कॉफीचं सेवन करू नका.
नियमित एक्सरसाइज
फिट राहण्यासाठी दररोज एक्सरसाइज करावी. शारीरिक रूपाने फिट राहण्यासाठी योगाभ्यासही करू शकता. योगाभ्यास केल्याने शरीरात ऊर्जा कायम राहते. याचा प्रभाव आरोग्यासोबतच त्वचेवरही दिसू लागतो. दररोज किमान ३० मिनिटे एक्सरसाइज करा, जेणेकरून तुमचं शरीर दिवसभर ताजंतवाणं राहील.
पौष्टिक आहाराची सवय
तुम्ही हेल्दी आहार घेतला तर त्वचाही चमकदार होईल. शरीरही वेगवेगळ्या रोगांपासून दूर राहणार. त्वचेवर तजेलदारपणा आणण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा ठरतो. शिळं अन्न खाल्ल्याने शरीरात फॅट जमा होतं. संतुलित आहार घ्याल, फळांचा ज्यूस सेवन करा तर चेहरा ग्लो करेल. त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुम्ही नेहमी तरूण दिसाल.