शरीरावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता आणि सर्वात सोपी पद्धत कोणती वाटते? या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त महिला आणि पुरूष रेजर हेच देतील. कारण याने लवकर शेव्हिंग होतं आणि कोणताही त्रास होत नाही.
पण जास्तीत जास्त ब्यूटी एक्सपर्ट्स खासकरून अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजरऐवजी वॅक्सिंगचा चांगला पर्याय मानतात. पण पार्लरला जाऊन वक्सिंग करणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशात जर तुम्ही अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजर वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
१) मल्टी ब्लेड रेजरचा वापर करू नये. कारण याप्रकारच्या रेजरमुळे स्कीनवरील फार जवळचे केस ओढले जातात आणि कापले जातात, याने स्कीनचं नुकसान होऊ शकतं. सोबतच त्वचेच्या खाली इनग्रोन केसही उगण्याची शक्यता अधिक वाढतो.
२) धार खराब झालेल्या रेजरचा वापर अजिबात करू नका. क्लीन आणि चांगल्या शेव्हिंगसाठी शार्प रेजर किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रिमरचा वापर करा. जर तुम्हाला वाटत असेल की, रेजर स्कीनवर स्मूथली चालत नाहीये, तर हा संकेत आहे की, तुम्ही रेजर बदलायला हवं.
३) अंडरआर्म्स शेव करण्याआधी त्या भागात गरम पाणी लावा आणि २ ते ३ मिनिटे वाट बघून जेव्हा केस पूर्णपणे भिजतील तेव्हा शेव्हिंग करा.
४) कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अंडरआर्म्समध्ये शेव्हिंग जेलचा वापर करू शकता. असं केल्याने रेजरही स्कीनवर सहजपणे काम करेल.
५) अंडरआर्म्समधील केस हे वेगवेगळ्या दिशेने उगवतात. अशात योग्य डायरेक्शनने रेजर फिरवणे गरजेचे आहे. सोबत रेजर फिरवताना स्कीन स्ट्रेच करायला विसरू नका.
६) अंडरआर्म्सच्या शेव्हिंगनंतर एखादं क्रीम किंवा तेल लावा, याने स्कीन मुलायम राहण्यास मदत मिळेल.