शॅम्पूमध्ये 'या' ६ गोष्टींचा करा वापर, केस होतील आणखी सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:15 PM2018-10-22T12:15:16+5:302018-10-22T12:17:07+5:30

शॅम्पू एक असं उत्पादन आहे जे प्रत्येक घरात वापरलं जातं. तुम्हाला तुमच्या गरजेचेनुसार बाजारात शॅम्पू मिळतात.

Use these 6 things in shampoo, hair will be more beautiful! | शॅम्पूमध्ये 'या' ६ गोष्टींचा करा वापर, केस होतील आणखी सुंदर!

शॅम्पूमध्ये 'या' ६ गोष्टींचा करा वापर, केस होतील आणखी सुंदर!

Next

शॅम्पू एक असं उत्पादन आहे जे प्रत्येक घरात वापरलं जातं. तुम्हाला तुमच्या गरजेचेनुसार बाजारात शॅम्पू मिळतात. ज्या लोकांना केस आणखी मजबूत करण्यासाठी किंवा त्यांना चमकदार करण्यासाठी हेअर मास्क किंवा त्यासारख्या गोष्टी वापरता येत नसतील त्यांनी शॅम्पूमध्ये काही गोष्टी मिश्रित केल्या तर याचा दुप्पट प्रभाव दिसून येऊ शकतो. या गोष्टी घरात सहजपणे उपलब्ध होऊ शकतात आणि वापरण्यासही सोप्या असतात.  

आवळा ज्यूस

आवळा ज्यूस तुमच्या केसांसाठी फार फायदेशीर असतो. जर एक छोटा चमचा आवळ्याचा ज्यूस तुम्ही शॅम्पूमध्ये मिश्रित केला तर केस काळे होण्यास मदत होईल. याने केसांची वाढही चांगली होते आणि हे कंडिशनरसारखंही काम करतं. प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही शॅम्पू करता तेव्हा हे करा आणि याचे फायदेही तुम्हाला लगेच दिसायला लागतील. 

लॅवेंडरचं तेल

जर तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये लॅवेंडर तेलाचे काही थेंब वापरले तर याचे फायदे होतात. याने तुमचे केस वाढण्यास मदत होईल. लॅवेंडरने डोक्यांला शांतताही मिळते आणि आरामही मिळतो. जर तुम्हाला फार मानसिक तणाव असेल तर शम्पूमध्ये लॅवेंडर तेलाचे काही थेंब टाका याने तुमचा सगळा ताण दूर होईल. 

मध

जर तुमचे केस रखरखीत झाले असतील तर तुमच्या शॅम्पूमध्ये एक छोटा चमचा मध वापरा. मधाने डोक्यातील बॅक्टेरिया मरतील आणि केसांना चमकही मिळेल. पण हे लावल्यावर केस चांगले धुवा जेणेकरुन मध केसांमध्ये राहणार नाही. 

गुलाब जल

जर तुमच्या डोक्यात सतत खाज येत असेल तर शॅम्पूमध्ये थोडं गुलाब जल टाका. याने खाजेपासून तुम्हाला सुटका मिळेल आणि डोक्याची त्वचाही चमकदार होईल. जेव्हाही तुम्हाला डोक्यात खाज आली तर असे करा. 

कोरफड जेल

कोरफड जेलचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. त्वचेसंबंधी कोणत्याही समस्येसाठी कोरफड हा चांगला पर्याय मानला जातो. अलिकडे कोरफड फ्लेवरची ग्रीन टी आणि ज्यूसही बाजारात उपलब्ध आहे. जर तुम्ही शॅम्पूमध्ये कोरफड डेल मिश्रित केलं तर डोक्याच्या त्वचेत येणारी खाजही दूर होईल. कोरफडीच्या जेलने  केस तुटणेही कमी होतं. 

लिंबाचा रस 

जर तुम्हाला तुमचे केस मुळातून स्वच्छ करायचे असेल तर एक छोटा चमचा लिंबाचा रस शॅम्पूमध्ये मिश्रित करा. ज्यांच्या केसांवर वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केल्याने घाण झालेली असते त्यांच्यासाठी हे फार फायदेशीर ठरु शकतं. लिंबाच्या रसामुळे तुमच्या डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हलही बॅलेन्स राहतं. 

(टिप : काही लोकांना वरीलपैकी काही गोष्टींची अॅलर्जी असू शकते त्यामुळे हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा)

Web Title: Use these 6 things in shampoo, hair will be more beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.