Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:13 PM2019-02-07T16:13:58+5:302019-02-07T16:15:24+5:30

व्हॅलेंटाइन डेला ग्लॅमरस आणि आकर्षक लूक करून पार्टनरला सरप्राइज देण्याचंही प्लॅनिंग अनेकजण करत असतील.

Try this for a few minutes for 'Valentine's Day' 6 Wonder Look | Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक

Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक

Next

सध्या तरूणाईमध्ये एकाच गोष्टीची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. ती म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या तयारीची. व्हॅलेंटाइन डेला ग्लॅमरस आणि आकर्षक लूक करून पार्टनरला सरप्राइज देण्याचंही प्लॅनिंग अनेकजण करत असतील. अशांसाठी आम्ही काही मिनिटांमध्ये करू शकाल असेल काही स्टायलिश लूक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे लूक कसे करायचे याच्या टिप्सही आम्ही देऊ. जेणेकरून तुमचा व्हॅलेंटाइन डे हटके आणि यादगार होईल,  

कर्ली गर्ल लूक (curly girl look) 

(Image Credit : www.msbeautyglam.com)

हा क्यूट लूक मिळवण्यासाठी सर्वातआधी केस चांगल्याप्रकारे मोकळे करा. हॉट रोल्स केसांच्या टोकापासून मानेपर्यंत रोल करा. म्हणजे केस चांगल्याप्रकारे कर्ल होतील. त्यानंतर साधारण १ मिनिटांसाठी केस चांगले ड्राय करा. नंतर केस रोलर्स लावून काही वेळासाठी तसेच ठेवा. काही वेळाने केस अनरोल करा आणि चांगल्याप्रकारे स्क्रन्च करा. 

फिश टेल मर्मेड लूक(Fish tail mermaid look) 

(Image Credit :more.com)

जलपरींच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. या व्हॅलेंटाइन डेला तुम्ही स्वत:ही जलपरीसारखी सुंदर दिसू शकता. या लूकसाठी मान खाली करून केस चांगल्या प्रकारे मोकळे करा, केस चांगले सॉफ्ट होऊ द्या. नंतर केस डोक्याच्या डाव्या बाजूला करून केस बरोबर दोन भागांमध्ये विभागून घ्या. नंतर एका बाजूचे थोडे केस घ्या आणि डावीकडून उजवीकडे प्लेट्स तयार करा आणि नंतर दुसरीकडूनही ही प्रोसेस करा. 

रेट्रो लूक (Retro look) 

(Image Credit : www.fashionlady.in)

केसांमध्ये चांगल्याप्रकारे कंगवा फिरवून केस दोन भागात विभागा. समोरून कॅज्यूअल नैसर्गिक पार्टिशन करा आणि मागून दोन सैल पॉनी टेल तयार करा. जेल लावून केस खालून चांगल्याप्रकारे टसल करा. या लूकसोबत मॅचिंग इअररिंग्स असेल तर लूक आणखी आकर्षक होईल.

फंकी लूक (Funky look) 

(Image Credit : NBT)

या हेअरस्टाइलसाठी रात्रभर छोट्या वेण्या करून तशाच ठेवा. जर तुम्ही असं करू शकत नाही तर काही वेण्या घालून ड्रायरने कोरड्या होऊ द्या. नंतर या वेण्या सोडा आणि बोटांच्या मदतीने केसांना वेव करा. वरून फ्लोरल हेअरबॅंड किंवा डाव्या बाजूला फूल लावा. हा लूक फारच वेगळा वाटेल.

स्लीक अ‍ॅंन्ड स्टाइलिश अपडू (Sleek and stylish updo) 

(Image Credit : NBT)

या शानदार हेअरस्टाइलसाठी  केस कर्ल करून वरच्या बाजूला फॅन्सी क्लचरने बांधा. ही हेअरस्टाइल एथनिक वेअरसाठी परफेक्ट ठरेल. तुम्ही या हेअरस्टाइलसोबत केसांमध्ये अ‍ॅक्सेसरीजही वापरू शकता. 

Web Title: Try this for a few minutes for 'Valentine's Day' 6 Wonder Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.