(Image Credit : kshamicamd.com)
चेहरा तुमच्या आरोग्याबाबत अनेक गुपितं उघड करत असतो. फक्त गरज असते ती गुपितं ओळखण्याची. शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व्हिटॅमिन बी १२ ची कमतरताही चेहऱ्यावर दिसणाऱ्या लक्षणांवरून ओळखता येऊ शकते. लाल रक्तपेशींची कमतरता असणे ही एक गंभीर समस्या असू शकते. अशात ही लक्षणे ओळखणे आणखीनच गरजेचं असतं.
त्वचा पिवळी होणे
काही लोकांचा चेहरा इतरांच्या तुलनेत अधिक जास्त पिवळा असतो. तसं तर या गोष्टींला फार गंभीरतेने घेतलं जात नाही. पण अशा स्थितीत टेस्ट करून घेणे हाच सर्वात चांगला पर्याय असतो. चेहऱ्यावरील पिवळेपणा हा शरीरात झालेली व्हिटॅमिन सी ची कमतरता दाखवतो.
डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे
डोळ्यातील पांढरा भाग हा अनेकदा काही वेळासाठी पिवळा होत असेल तर ठीक. पण जर सतत असं होत असेल तर हा काविळचा संकेत आहे. यामागील कारण व्हिटॅमिन बी१२ ची शरीरात कमतरता हे असू शकतं.
पांढरे चट्टे
त्वचेवर पांढरे चट्टे दिसणे हा सुद्धा शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असल्याचा संकेत आहे. या चट्ट्यांनी भलेही शरीराचं नुकसान होत नसेल पण याने शरीराच्या गरजेकडे इशारा केला जातो.
व्हिटॅमिन बी१२ स्त्रोत
व्हिटॅमिन बी१२ दुधात भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे दुधाचा आहारात नियमित समावेश करा. तसेच पपई, गाजर, खरबूज, सफरचंद, ब्रोकली, ढोबळी मिरची यातही व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात असतं.