उन्हाळ्यात डिफ्रंट आणि कूल लूक हवाय?; 'या' हेअर स्टाइल्स ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:43 PM2019-05-08T17:43:35+5:302019-05-08T17:44:17+5:30

उन्हाळ्यामध्ये वातावरणानुसार फक्त तुमचा वॉर्डरोब आणि आउटफिट्समध्येच बदल करणं गरजेचं नसतं, तर हेअरस्टाइलकडेही लक्ष देणं गरजेचं असतं.

Summer hairstyle for short hairs | उन्हाळ्यात डिफ्रंट आणि कूल लूक हवाय?; 'या' हेअर स्टाइल्स ट्राय करा

उन्हाळ्यात डिफ्रंट आणि कूल लूक हवाय?; 'या' हेअर स्टाइल्स ट्राय करा

Next

उन्हाळ्यामध्ये वातावरणानुसार फक्त तुमचा वॉर्डरोब आणि आउटफिट्समध्येच बदल करणं गरजेचं नसतं, तर हेअरस्टाइलकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. अनेक तरूणींना लांब केसांची आवड असते. परंतु, सध्या तरूणी आपल्या केसांसोबत एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. त्यासाठी लॉन्ग हेयर्सपासून ते शॉर्ट हेयरपर्यंत सर्व लूक्स त्या ट्राय करतात. अशातच आता उन्हाळा असून वातावरणात प्रचंड उकाडा आहे. अनेक तरूणी उन्हाळ्यासाठी शॉर्ट हेअर कट्सची निवड करतात. त्यामागे डिफ्रंट लूकसोबतच गळ्याजवळ येणारे आणि खांद्यावर पडणाऱ्या केसांपासून सुटका करून घेणं हादेखील उद्देश असतो. 

समर सीझनबाबत सांगायचे झाले तर, बॉब कट्स, क्रॉप कट आणि पिक्सी कट अत्यंत ट्रेन्डमध्ये आहे. या हेयरस्टाइल्सबाबत खास गोष्ट म्हणजे, या शॉर्ट केसांना मेनटेन करणंदेखील अत्यंत सोपं आहे. त्यासोबतच या उन्हाळ्यामध्ये या स्टाइल्स तुम्हाला प्लेफुल, बोल्ड आणि कूल लूक देण्याचंही काम करतात. 

लेयर्ड बॉब हेअर कट 

- या हेअरस्टाइल्समध्ये डोक्यावरील क्राउन पोर्शनमध्ये केसांना खूप वॉल्यूम मिळतो. 

- गोल किंवा चौकोनी शेपच्या फेससाठी ही हेअर स्टाइल परफेक्ट आहे. 

ए शेप्ड ब्लंट हेयर कट 

- फ्लॅट आयरन्ड हेयर्ससाठी हा कट परफेक्ट आहे

- हा हेअरकटमुळे स्वीट आणि फेमिनिन लूक मिळवण्यासाठी मदत होते

- या हेअरस्टाइलमुळे तुमचा चेहरा वयापेक्षा कमी दिसतो. 

ग्रॅज्युएटेड बॉब 

- या हेअरस्टाइलमुळे केसांना वॉल्यूम आणि थिकनेस मिळतो.

- जर तुमचे केस मोठे आहेत आणि चेहरा लहान असेल तर ही हेअरस्टाइल परफेक्ट आहे.

- हा हेअरकट मेनटेन करणं अत्यंत सोपं आहे. 

पिक्सी हेअर कट 

- या हेअरस्टाइलमध्ये मागील बाजूस आणि साइडच्या बाजूला केस छोटे आहेत. परंतु, क्राउन पोर्शनमध्ये लांब असतात. 

- हा क्रॉप हेअर कटचा एक प्रकार आहे. 

- पिक्सी हेअर कट सिलेब्समध्येही फेमस आहे आणि तुमच्या लूकला ड्रामॅटिकली बदलू शकतो. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Summer hairstyle for short hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.