शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:09 IST

आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करत असतात. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षं करतो.

आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करत असतात. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षं करतो. हिरव्या पालेभाज्या आणि फळं आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. अनेकदा त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. पण त्याऐवजी जर नैसर्गिक उत्पादनांचा आधार घेतला तर त्यामुळे समस्या दूर होण्यासोबतच आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते. केस गळण्याच्या समस्यांनी हैराण असाल तर स्वयंपाक घरात असणारे पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे केसांचं आरोग्य राखण्यासोबतच केस मुलायम आणि दाट होण्यासही मदत होते. 

1. अवोकाडो 

जर तुमचे केस ड्राय आणि निस्तेज झाले असतील तर या समस्या दूर करण्यासाठी अवोकाडोचा उपयोग करू शकता. यामध्ये आढळून येणारी पोषक तत्व व्हिटॅमिन बी आणि ई यांसारखी पोषक तत्व केसांच्या समस्या दूर करतात. त्यासाठी अवोकाडोची पेस्ट 20 मिनिटांसाठी केसांना लावा त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा. 

2. गाजर 

गाजराचा उपयोग करण्यासाठी डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते. ज्याप्रमाणे गाजराचं सेवन दररोज करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे गाजराचा ज्यूस केसांना लावणं केसांसाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी गाजराचा रस काढून 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर केसांच्या मुळांशी लावून काही मिनिटांसाठी तसचं ठेवा. अर्धा तास ठेवल्यानंतर केस धुवून टाका. 

3. कांदा 

कांदाचा रस केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करतो. त्याव्यतिरिक्त केसांच्या मुळांना मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि केसांचं आरोग्य सुधारतं. तसेच केसांची वाढही होते. 

4. केळी 

केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि पोटॅशिअम अस्तित्तावत असतं. जे केसांसाठी अत्यंत फायेदशीर ठरतं. केसांच्या मजबुतीसाठी केळी स्मॅश करून घ्या. त्यामध्ये मध एकत्र करून पेस्ट तयार करा. केसांच्या मुळांशी लावून 30 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतप माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. 

(Image Credit :Medical News Today)

5. नारळाचं दूध 

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेतच. तसंच नारळाचं दूधही आरोग्यासोबतच केसांसाठी फायदेशीर ठरतं. नारळाचं दूध केसांसाठी सर्वात उत्तम उपाय मानला जातो. नारळाच्या दूधामध्ये मध एकत्र करून केसांना लावल्यामुळे डोक्याच्या त्वचेला मालिश करा. एक तास तसचे ठेवा त्यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. 

6. दलिया 

दलियामध्ये आढळून येणारी पोषक तत्व आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त हे केसांना पोषक तत्व पुरवतात. एक मोठा चमचा ताज्या दूधामध्ये दलिया एकत्र करून केसांच्या मुळांना लावा. 30 मिनिटांनी कोमट पाण्याने केस स्वच्छ करा. यामुळे केस मजबुत होण्यासोबतच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य