पचनक्रिया सुधारण्यासाठी वेळेवर झोपा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:37 IST
पचनक्रिया सुधारण्यासाठी वेळेवर झोपाज्या महिला वेळेवर झोपतात त्यांची पचनक्रिया इतर महिलांच्या तुलनेत चांगली असते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी वेळेवर झोपा
झोपेची निश्चित अशी वेळ न पाळल्यामुळे ग्लुकोजचे पचन आणि घेतलेली अन्नाची मात्रा व त्याबदल्यात खर्च झालेली ऊर्जा यांचा समतोल यावर विपरित परिणाम होतो असे, एका संशोधनाअंती आढळले आहे. पिट्सबर्ग विद्यापीठातील प्राध्यापिका मार्टिका हॉल यांनी सांगितले की, ‘अनिश्चित झोपेची वेळ, रात्री उशिरापर्यंत जागणे अशा सवयी मध्यमवयीन महिलांमध्ये दिसून आल्या. ज्यांच्यामध्ये इन्सुलिन अवरोध आहे. पचनक्रियेतील त्रासाचा हे सर्वात मोठे लक्षण आहे. ज्यामुळे कदाचित मधुमेह होण्याचीदेखील शक्यता असते.’दररोज ठरलेल्या वेळीच झोपणे आणि ठरलेल्या वेळीच उठण्याची सवय कटाक्षाने पाळली पाहिजे. सात ते आठ तासांची झोप पुरेशी आहे. संशोधकांनी स्वान स्लिप स्टडीमधील माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढले आहेत. वुमेन्स हेल्थ अॅक्रॉस द नेशनतर्फे हे संशोधन करण्यात आले.४८ ते ५८ वयोगटातील ३७० गृहिणींंचा अभ्यास यावेळी करण्यात आला. यामध्ये कॉकॅशिअन, आफ्रिकन अमेरिकन आणि चीनी महिलांचा समावेश होता. गोळा झालेल्या महितीवरून असे दिसून आले की, झोपेची वेळ सतत बदलल्यामुळे इन्सुलिन अवरोध निर्माण होतो आणि झोपेची वेळ जर पाळली तर उच्च बॉडी मास इंडेक्स आढळतो.