त्वचा काळी असणे ही महिलांच्या दृष्टीने खूप मोठी समस्या नव्हे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 19:20 IST
आजच्या काळातील महिलांच्या दृष्टीने काळी त्वचा असणे हे चिंतेचे कारण नाही. याउलट ३६ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा फेअर किंवा लाईट स्कीन टोन आहे. तर ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा मिडियम स्कीन टोन आहे.
त्वचा काळी असणे ही महिलांच्या दृष्टीने खूप मोठी समस्या नव्हे !
-रवीन्द्र मोरे आघाडीच्या सौंदर्य सेवा पुरविणाऱ्या व इंटरनेट सलून असलेल्या एका वेबसाइटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, आजच्या काळातील महिलांच्या दृष्टीने काळी त्वचा असणे हे चिंतेचे कारण नाही. या सर्वेक्षणात मुंबई, पुण्यातील १७ ते ३५ वयोगटातील ५१२ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील केवळ ३ टक्के महिलांनी काळी त्वचा असल्याचे मान्य करत यावर काहीतरी उपाय करण्याची आवश्यकता असे सांगितले.खरंतरं यापैकी २ टक्के महिलांनी याबाबत काळजी वाटते असे सांगितले. याउलट ३६ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा फेअर किंवा लाईट स्कीन टोन आहे. तर ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा मिडियम स्कीन टोन आहे.या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आश्चर्यकारक असून भारतीय महिला त्यांच्या त्वचेकडे कशा पाहतात याचा पारंपरिक समज या सर्वेक्षणातून बदललेला दिसतो.गेल्या काही वर्षात फेअरनेस क्रीमचा व्यवसाय कमी होत असून याबाबतच्या बातम्यांशी सुसंगत असा हा निष्कर्ष आहे.या सर्वेक्षणात असमान स्कीन टोन हा त्वचेशी निगडीत सर्वांत मोठा काळजीचा विषय २८ टक्के महिलांना वाटतो. तर पुरळ आणि डाग हे २७ टक्के महिलांना काळजीचे कारण वाटते. सूर्यप्रकाशामुळे होणारे त्वचेला झालेले नुकसान, काळी वर्तुळे, त्वचेची संवेदनशीलता व कोरडेपणा हे देखील काळजीचे कारण असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. Also Read : घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा ! : सावळा रंग उजाळण्यासाठी !या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या १२ टक्के महिलांनी फेअरनेस क्रीम वापरल्याचे मान्य केले तर लक्षणीय म्हणजे ४३ टक्के महिलांनी स्कीन टोन सुधारण्याकरिता काहीही केले नसल्याचे सांगितले. तुमचा स्कीन प्रकार कोणता हे विचारले असता ४ पैकी एकहून अधिक महिला म्हणाल्या की, त्यांची त्वचा टीझोन मध्ये तेलकट आहे तर उर्वरित त्वचा कोरडी आहे. २३ टक्के महिला म्हणाल्या त्यांची त्वचा फक्त तेलकट आहे, तर १२ टक्के महिला म्हणाल्या की त्यांची त्वचा संवेदनशील आहे. त्वचा प्रकारानुसार चुकीचे त्वचा उपचार बरेचदा महिला घेत असतात ज्यामुळे सौंदर्य उपचाराबाबत त्यांच्यात असंतोष निर्माण होऊ शकतो.