बेसन सौंदर्य वाढविण्यासाठी ठरतं फायदेशीर; असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:13 PM2018-09-16T13:13:49+5:302018-09-16T13:27:18+5:30

स्वयंपाकघरात सर्रास आढळून येणारं बेसन त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. स्वच्छ आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी फार पूर्वीपासूनच बेसनाचा वापर करण्यात येतो.

skin care home made besan face packs to get soft and beautiful skin | बेसन सौंदर्य वाढविण्यासाठी ठरतं फायदेशीर; असा करा वापर!

बेसन सौंदर्य वाढविण्यासाठी ठरतं फायदेशीर; असा करा वापर!

googlenewsNext

स्वयंपाकघरात सर्रास आढळून येणारं बेसन त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. स्वच्छ आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी फार पूर्वीपासूनच बेसनाचा वापर करण्यात येतो. बेसन त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे त्वचा उजळवण्यासही बेसन फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने उजाळा आणायचा असेल तर दररोज बेसनाचा वापर करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. 

बेसनाचा उपयोग अन्य पदार्थांसोबत करून चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यास मदत होते. बेसन त्वचेला लावल्याने कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स होत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर तुम्ही बेसनाचा उपयोग करू शकता. बेसन त्वचेवरील टॅन आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा झाला असेल तर त्यासाठीही बेसनचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. 

बेसनाचे फायदे

त्वचेवर बेसनाचा फेस पॅक आणि मास्क लावून तुम्ही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणू शकता. बेसनामध्ये मुबलक प्रमाणात क्षार आढळून येतात. बेसन आणि दही एकत्र केल्यावर आम्ल तयार करता येतं. त्वचेच्या प्रकारानुसार बेसनाचा फेस पॅक वापरणं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे मान आणि त्वचेचा कोणताही भाग काळवंडलेला असेल तर त्यावर बेसन लावणं फायदेशीर ठरतं. 

1. पिंपल्स दूर करण्यासाठी 

जर त्वचेवर खूप पिंपल्स झाले असतील तर बेसनापासून तयार केलेला फेस पॅक त्यावर परिणामकारक ठरतो. बेसनासोबत चंदन पावडर, हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. त्यानंतर धुवून टाका. असे आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा करा. याव्यतिरिक्त बेसन आणि मध एकत्र करून लावणंही पिंप्लस दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

2. तेलकट त्वचेसाठी 

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही दही, गुलाब पाणी आणि बेसन एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवर असलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. बेसन, मध, थोडीशी हळद आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 

3. टॅनिंग दूर करण्यासाठी 

बेसन चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी परिणामकारक ठरतं. टॅनिंगसाठी बेसनाचा पॅक तयार करण्यासाठी 4 बदामांची पावडर, 1 चमचा दूध, थोडा लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून 30 मिनिटांपर्यंत लावून ठेवा आणि चेहरा धुवून घ्या. काही दिवस हा पॅक वापरल्याने टॅनिंग दूर होण्यास मदत होईल. 

4. नको असलेले केस काढून टाकण्यासाठी

जर तुमच्या चेहऱ्यावर केस असतील आणि तुम्हाला ब्लीच करायचे नसेल तर तुम्ही बेसनाच्या मदतीने हे काम करू शकता. बेसनामध्ये थोडं लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर पेस्टच्या सहाय्याने त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. काही वेळ ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहऱ्यावरील केस नाहीसे होतील. 

5. शुष्क त्वचेसाठी

या समस्येपासून बचाव करण्यासाठी  बेसन फायदेशीर ठरतं. यासाठी बेसनामध्ये मलई किंवा दूध, मध आणि थोडीशी हळद एकत्र करा. हा पॅक 15 ते 20 लावामिनिटांसाठी चेहऱ्यावर  आणि पाण्याने धुवून टाका. बेसन लावल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि चेहऱा मुलायम होण्यासही मदत होते. 

6. काळवंडलेल्या त्वचेसाठी

अनेकदा सतत बाहेर फिरल्यामुळे किंवा त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा काळवंडते. अशावेळी त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच त्वचा उजळवण्यासाठी बेसनाचा फेस पॅक फायदेशीर ठरेल. त्यासाठी बेसन, दही आणि हळद एकत्र करून काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 

Web Title: skin care home made besan face packs to get soft and beautiful skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.