पावसाळ्यातही Sunscreen लावणं गरजेचं; कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:34 PM2019-07-25T15:34:04+5:302019-07-25T15:39:14+5:30

सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीम महत्त्वाचं आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील त्याचा वापर करणं गरजेचं आहे.

should we apply sunscreen even in monsoon season | पावसाळ्यातही Sunscreen लावणं गरजेचं; कसं ते जाणून घ्या

पावसाळ्यातही Sunscreen लावणं गरजेचं; कसं ते जाणून घ्या

Next

उन्हाळा आला की, अनेकजण उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात. उन्हाळ्यात घराबाहेर जाताना त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन महत्त्वाची असते. मात्र फक्त उन्हाळ्यात नाही तर पावसाळ्यात देखील सनस्क्रीनचा वापर करणं हे त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीम लावणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील त्याचा वापर करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यासोबत पावसाळ्यात देखील त्वचेची उत्तम काळजी घेणं आवश्यक असतं. 

'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

- पावसाळ्यात वॉटर रेजिस्टेंट सनस्क्रीनचा प्रामुख्याने वापर करा.

- बाहेर फिरताना आपल्या बॅगेत सनस्क्रीन ठेवा. तीन तासांनंतर पुन्हा एकदा त्याचा वापर करा. 

- हाय एसपीएफच्या सनस्क्रीनची पावसाळ्यात गरज नाही. 

- एसपीएफ 15 चा वापर करून सूर्याच्या किरणांपासून बचाव करता येतो. 

- पावसाळ्यात जेल बेस्ड सनस्क्रीमची निवड करा. 

सनस्क्रीन वापरताना 'या' चुका टाळा

केवळ सनस्क्रीन लावून त्वचेची सुरक्षा होते असे नाही तर त्यासाठी सनस्क्रीन लावताना केल्या जाणाऱ्या काही चुकाही टाळाव्या लागतात. 

योग्य वेळ - सामान्यपणे लोक घरातून बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करतात. पण असं करु नये. कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण 10 ते 15 मिनिट आधीच सनस्क्रीनचा वापर करा. असं केल्याने सनस्क्रीनला त्याचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि नंतर याने तुमचा उन्हापासून चांगला बचावही होतो.

एकदा लावणे - अनेकांना असं वाटतं की, दिवसातून केवळ एकदाच सनस्क्रीनचा वापर करणं पुरेसं आहे. तुम्हीही असं करत असाल तर हे चूक आहे. सनस्क्रीन दोन ते तीन तासांनी पुन्हा लावायला पाहिजे. हेही लक्षात ठेवा की, स्वीमिंग आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर सनस्क्रीनचा त्वचेवर वापर आवर्जून करावा.

केवळ उन्हात वापरा - जास्तीत जास्त लोकांना असं वाटत असतं की, सनस्क्रीन केवळ उन्हातच त्वचेची सुरक्षा करते. कोणतही वातावरण असो घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीनचा वापर करा. कारण सनस्क्रीन कोणत्याही वातावरणात आपल्या त्वचेची सुरक्षा करतं.

डार्क त्वचेवर न वापरणं - डार्क त्वचा असलेल्या अनेक लोकांना वाटतं की, त्याना सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही. पण असं नाहीये. कारण सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे स्कीनच्या कोणत्याही टोनसाठी उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर होणं गरजेचं आहे. 

एसपीएफची काळजी - सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे एक रेटींग फॅक्टर आहे जे सांगतं की, कोणतं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत बचाव करतं. 

(टिप : वरील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काहींना सनस्क्रीनची अ‍ॅलर्जी असून शकते. त्यामुळे आधी तज्ज्ञांकडून सल्ला घेणे गरजेचे आहे.)

 

Web Title: should we apply sunscreen even in monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.