शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Beauty tips: परफ्युमचा सुगंध दिर्घकाळ राहावा असं वाटतं असेल तर वापरा 'या' हॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:40 IST

बाहेरच्या वातावरणातील धूर, धूळ, घाम यांच्या तीव्र माऱ्यातून परफ्युमचा सुगंध टिकून राहणे कठीण असल्याचा अनुभव अनेकदा येतो. मीडिया अहवालानुसार, ही समस्या एका साध्या सोप्या उपायाने दूर करता येते असा दावा एका टिकटॉक युजरने केला आहे

दररोज ऑफिसला जाण्याची तयारी करायची असो किंवा एखाद्या समारंभासाठी, उत्सवासाठी ड्रेस, मेकअप अशा सगळ्या तयारीचा शेवट होतो तो परफ्युमनं (Perfume). परफ्युम लावल्याशिवाय कोणाची तयारी पूर्ण होत असेल असं वाटत नाही. वेगवेगळे सुगंध असणारे परफ्युम्स मन प्रसन्न करतात. त्यामुळे सकाळी कामावर जाताना प्रत्येकजण आपल्या आवडीच्या सुवासाचा परफ्युम लावून बाहेर पडणं पसंत करतात. यामुळे मन दिवसभर ताजंतवानं राहतं. परफ्युमच्या मंद सुवासामुळे वातावरणही प्रसन्न राहतं. मुंबईसारख्या ठिकाणी तर घामाचा त्रास खूप होतो, अशावेळी परफ्युम खूपच महत्त्वाचा ठरतो. पार्टी, समारंभ अशा ठिकाणी जिथे अनेक लोकांशी आपला संपर्क येतो अशावेळी परफ्युम वापरणं तर अत्यावश्यक ठरतं.

बाजारपेठेत आपल्याला अनेक प्रकारचे परफ्युम्स मिळतात. स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स असतात. परफ्युमचा गंध दीर्घकाळ दरवळत राहावा जेणेकरून आपल्याला आणि आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांनाही प्रसन्न वाटेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण बाहेरच्या वातावरणातील धूर, धूळ, घाम यांच्या तीव्र माऱ्यातून परफ्युमचा सुगंध टिकून राहणे कठीण असल्याचा अनुभव अनेकदा येतो.

मीडिया अहवालानुसार, ही समस्या एका साध्या सोप्या उपायाने दूर करता येते असा दावा एका टिकटॉक युजरने केला आहे.  हा उपाय आहे पेट्रोलियम जेलीचा (Petorleum Jelly). पेट्रोलियम जेली आणि परफ्युमचा सुगंध टिकून राहण्याचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल ना? पण पेट्रोलियम जेली तुमच्या परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत करते, असं यामध्ये म्हटलं आहे. द गार्डियन डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

एका टिकटॉक (Tiktok) युजरने याबाबत माहिती दिली असून, पेट्रोलियम जेली युक्त मॉईश्चरायझर (Moisturizer) वापरल्यामुळे परफ्युम दीर्घकाळ टिकू शकतो, असा दावा यात केला गेला आहे. परफ्युममध्ये अल्कोहोल (Alcohol) असतं त्यामुळे हवेचा संपर्क आल्यावर ते उडून जातं. परिणामी वेळ निघून जातो तसा परफ्युमचा वास कमी कमी होत जातो. अस्सल परफ्युमची किंमतही खूप महाग असते आणि असे महागडे परफ्युम त्वचेवर लावल्यानंतरही ते काही काळाने हवेत उडून जातात. त्यामुळे त्याचा सुवास संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत टिकून राहावा यासाठी पुन्हापुन्हा तो लावणं शक्य नसते. यामुळं एकदा लावलेला परफ्युम दीर्घकाळ टिकून राहावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पेट्रोलियम जेली उपयुक्त ठरते, अशी ही हॅक आहे.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन