OMG !!! प्रियंका चोपडाचा डबलरोल आहे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:39 IST
बॉलिवूड मध्ये आपला ठसा उमटणारी अभिनेत्री प्रियंका चोपडाला कोण नाही ओळखणार.
OMG !!! प्रियंका चोपडाचा डबलरोल आहे !
बॉलिवूड मध्ये आपला ठसा उमटणारी अभिनेत्री प्रियंका चोपडाला कोण नाही ओळखणार. प्रियंकाने हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र आपल्याला माहित पडले की तिचा ही डबलरोल आहे, तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. हो हे खरे आहे. कॅनडाच्या वैंकूवर मध्ये राहणारी नवप्रीत बांगाला भेटून किंवा तिला पाहून नक्की विश्वास होतो की, परमेश्वराने प्रत्येकाचा डबलरोल बनविला आहे. नवप्रीत बांगा फिटनेस व्लॉगर आहे. तिचे वय २१ वर्ष असून ती हेल्थ आणि फिटनेसशी संबंधीत खूपच प्रसिद्ध इंस्टाग्राम अकाऊंट ‘ब्राऊनगर्ललिफ्ट्स’ आणि यूट्यूब चॅनल चालविते. नवप्रीतने काही वेळा अगोदर स्वत:चा एक फोटोशूट केला होता, ज्यात तिने ‘बाजीराव मस्तानी’मधील प्रियंका चोपडाद्वारा निभविणाºया अवॉर्ड विनिंग पात्र ‘काशीबाई’चे रुप घेतले होते. ते फोटो पाहिल्यानंतर हे ओळखणे कठीण होते की, हे प्रियंकाचे फोटो नसतील.