हिरोसारखा परफेक्ट बिअर्ड लूक हवा, पण दाढीचे केसच वाढत नाहीत? चिंता सोडा, 'हे' नॅचरल उपाय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:57 IST2026-04-10T15:56:44+5:302026-04-10T15:57:19+5:30
How to Grow Beard Hair : आपल्याला सुद्धा दाढीवाला परफेक्ट लूक हवाय, पण दाढीचे केस हवे तसे वाढत नाहीत? तर चिंता सोडा.

हिरोसारखा परफेक्ट बिअर्ड लूक हवा, पण दाढीचे केसच वाढत नाहीत? चिंता सोडा, 'हे' नॅचरल उपाय करा
How to Grow Beard Hair : हल्ली अनेक सेलिब्रिटी बिअर्ड लूक म्हणजे दाढीवाला लूक ठेवतात. अर्थात आपल्या आवडत्या अभिनेत्या असा लूक केला म्हणजे आपणही केला पाहिजे असं अनेकांना वाटतं. इतकंच नाही तर तरूणींना सुद्धा तरूणांचा दाढीवाला लूक आवडतो असंही काही रिसर्चमधून समोर आलंय. त्यामुळे तरूण मंडळी दाढी कशी वाढेल या चिंतेत असतात. आपल्याला सुद्धा दाढीवाला परफेक्ट लूक हवाय, पण दाढीचे केस हवे तसे वाढत नाहीत? तर चिंता सोडा. कारण दाढी केस कसे भरभर वाढतील यासाठीचे काही सोपे नॅचरल उपाय आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
दालचीनीने वाढतील केस
दालचीनीचा वापर घरात वेगवेगळे पदार्थ तयार करताना केला जातो. पण दालचीनीचे आणखीही काही फायदे आहेत. दालचीनी केस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. दालचीनीचं पावडर लिंबाच्या रसात मिश्रित करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. जर तुमच्या त्वचेला लिंबूची अॅलर्जी असेल तर याचा वापर करू नका. असे केल्यास तुमच्या त्वचेवर जळजळ होईल.
खोबऱ्याच्या तेलाने मिळवा परफेक्ट लूक
कढीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा त्या तेलाने दाढीची मालिश करा. तसेच आवळा पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करा. आवळा पावडरचं प्रमाण 25 टक्के असावं. हे 2 मिनिटे उकळून घ्या. तेल थंड झाल्यावर त्याने दाढीची मालिश करा.
दाढीसाठी आवळा फायद्याचा
दाढीवरील केस वाढवण्यासाठी आवळ्याच्या तेलाने दाढीची मालिश करणे एक चांगला पर्याय आहे. आवळ्याच्या तेलाने रोज चेहऱ्यांची 20 मिनिटे मालिश करा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. आवळ्याच्या तेलासोबत राईची काही पाने मिश्रित करून पेस्ट तयार करा. त्यात एक थेंब आवळा तेल टाका. हे मिश्रण दाढीवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून तीन-चार वेळ हे करा.
काय करावे उपाय?
- रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल.
- नियमितपणे गाजराचा ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा.
- थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.