शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

केस काळे, चमकदार आणि मजबूत करण्यासाठी आवळ्याच्या तेलात टाका 'या' गोष्टी, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:05 IST

Amla Oil For Hair Growth: आवळ्याच्या तेलामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची वाढही होते.

Amla Oil For Hair Growth: लांब, दाट आणि काळे केस असावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण आजकालच्या खाण्या-पिण्याच्या काही चुकींमुळे किंवा चुकीच्या लाइफस्टाईलमुळे केस कमी वयातच पांढरे होतात. अशात ही समस्या दूर करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर ठरतो. आवळ्याच्या तेलामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची वाढही होते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आवळ्याच्या तेलामध्ये कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने जास्त फायदा मिळतो. 

मेथीचे दाणे आणि आवळा तेल

मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अ‍ॅसिड असतं, जे केसांना मुळापासून पोषण देतात आणि केसांची वाढ करतात. आवळा तेलामध्ये मेथीचे दाणे मिक्स करून लावल्याने केसगळतीची समस्या देखील कमी होते. यासाठी २ ते ३ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे दाणे बारीक करून आवळ्याच्या तेलात टाका. हे तेल केसांच्या मुळांना लावा आणि ३० ते ४० मिनिटे तसंच ठेवा. नंतर शाम्पूने केस धुवून घ्या.

एलोव्हेरा आणि आवळ्याचं तेल

एलोव्हेराने केस मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. तसेच यातील पोषक तत्वांमुळे केसांची वाढही होते. इतकंच नाही तर केसगळतीची समस्या देखील याने दूर होते. एलोव्हेरामधळी पोषक तत्वांमुळे केसांमधील कोंडाही निघून जातो. यासाठी ताज्या एलोव्हेराचं जेल घ्या आणि त्यात आवळ्याचं तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. काही वेळ हलक्या हाताने मालिश करा. एक तासानंतर केस धुवून घ्या.

कढीपत्ता आणि आवळा तेल

कढीपत्ता केसांचा नॅचरल रंग कायम ठेवण्यास फायदेशीर ठरतो. कमी वयात केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी याची मदत मिळते. आवळ्याच्या तेलात कढीपत्त्याची पाने मिक्स करून लावल्याने केसांची वाढही होते. यासाठी काही कढीपत्त्याची काही पाने आवळा तेलात टाकून गरम करा. जेव्हा पाने काळे होतील तेव्हा गाळून घ्या. थंड झाल्यावर केसांना लावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.

कांद्याचा रस आणि आवळा तेल

कांद्याच्या रसामध्ये सल्फर असतं, जे केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर असतं. आवळ्याच्या तेलात आणि कांद्याचा रस मिक्स करून लावल्यास केसांच्या मुळात ब्लड फ्लो वाढतो, ज्यामुळे केस वाढतात. यासाठी एका कांद्याचा रस घ्या आणि तो आवळ्याच्या तेलात मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस धुवून घ्या. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स