सावळा रंग उजाळण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:21 IST
सावळा रंग उजाळण्याठी बरेचजण महागडे सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक ट्रिटमेंट आणि बरेज काही पर्याय करताना दिसतात. मात्र, फारसा फरक पडत नसल्याचा अनुभव येतो.
सावळा रंग उजाळण्यासाठी !
सावळा रंग उजाळण्याठी बरेचजण महागडे सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक ट्रिटमेंट आणि बरेज काही पर्याय करताना दिसतात. मात्र, फारसा फरक पडत नसल्याचा अनुभव येतो. पण खालील टिप्सच्या साह्याने आपणास इतके परिश्रम घेण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून आपल्या सावळ्या रंगाला उजळू शकता. बदाम दुधाची करामतचार-पाच बदाम पहाटे पाण्यात भिजवून ठेवून संध्याकाळी त्यांची साल काढा. त्यानंतर त्यांना संपूर्ण एकजीव होईपर्यंत बारीक करुन दुधात मिसळा. यालाच बदाम दूध म्हणतात. हे बदाम दूध रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा व सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. सतत १५ दिवस असे लावल्याने चेहºयाची रंगत उजळेल.चिंचेची पेस्टरंग उजाळण्यात चिंचेची पेस्ट महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी ५० ग्रॅम चिंच २५० ग्रॅम पाण्यात भिजवा. १५ मिनिटांनी त्याला चांगल्याप्रकारे वाटून पेस्ट बनवा. याला संपूर्ण शरीरावर लावून १०-१५ मिनिटांनी अंघोळ करा. हा प्रयोग आठवड्यातून एक दिवस करा. यामुळे सावळेपणा दूर होईल. गुलाबजलगुलाबजलनेही आपण आपल्या त्वचेचा रंग उजळू शकता. त्यासाठी एक चमचा गुलाबजल व १०० ग्रॅम सफरचंदाचा रस दोन्ही एकत्र करुन सावळ्या त्वचेवर लावा. हे दररोज चेहऱ्यावर लावल्याने सावळा रंग गोरा बनतो.