जास्तीत जास्त पुरूषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:41 AM2019-10-15T10:41:45+5:302019-10-15T10:49:46+5:30

पहिल्यांदाच पुरूषांना टक्कल पडण्यासारख्या आणि त्यातून त्यांना येणाऱ्या समस्यांवर मोठ्या पडद्यातून मांडण्यात येणार आहे. आयुष्मान खुराणा याच्या 'बाला' सिनेमातून हा विषय दाखवण्यात येणार आहे.

Know why hair loss and baldness is more common in men | जास्तीत जास्त पुरूषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं? जाणून घ्या कारण...

जास्तीत जास्त पुरूषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं? जाणून घ्या कारण...

Next

पहिल्यांदाच पुरूषांना टक्कल पडण्यासारख्या आणि त्यातून त्यांना येणाऱ्या समस्यांवर मोठ्या पडद्यातून मांडण्यात येणार आहे. आयुष्मान खुराणा याच्या 'बाला' सिनेमातून हा विषय दाखवण्यात येणार आहे. असाच एक 'उजडा चमन' नावाचा सिनेमाही येणार आहे. तशी टक्कल पडण्याची समस्या सामान्य आहे. पण अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे कमी वयातच टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, महिलांच्या तुलनेत पुरूषांना काय समस्येचा सामना अधिक करावा लागतोय?

पुरूषांची टक्केवारी जास्त

एका रिसर्चनुसार, ७० टक्के पुरूष त्यांच्या जीवनात केसगळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. तेच महिलांमध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे.

टक्कल पडण्याचा खास पॅटर्न

पुरूषांना टक्कल पडण्याला एंड्रोजेनिक एलोपेसिया किंपा पॅटर्न बाल्डनेस असं म्हटलं जातं. या स्थितीत केस फोरहेड म्हणजे कपाळापासून वर गळणे सुरू होतात आणि नंतर क्राउन एरिया म्हणजे डोक्याच्या मध्यभागातील केसगळती होते. 

पुरूषांना टक्कल पडण्याचं कारण

(Image Credit : baldcelebs.blogspot.com)

पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं सर्वात मोठं कारण जेनेटिक्स आणि डी डायड्रो टेस्टोस्टेरॉन नावाचे मेल सेक्स हार्मोन्स असतात. एका रिसर्चनुसार, प्यूबर्टीदरम्यान मसल्स आणि हेड टिश्यू म्हणजे डोक्यातील पेशी स्ट्रेच होतात. यादरम्यान डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन सुद्धा मुलांच्या शरीरात जास्त रिलीज होऊ लागतात.

फॉलिकल्सला मिळत नाही पोषण

डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन जेव्हा जास्त होतं तेव्हा हेअर फॉलिकल्समधील एंड्रोजनरिसेप्टर्स जे केसांना हेल्दी ठेवण्यासाठी शरीरातून पोषण घेतात, ते हे हार्मोन जास्त घेऊ लागतात. हार्मोन्सचं प्रमाणा जास्त झालं की, फॉलिकल्स आकुंचन पावतात, ज्यामुळे ते केसांना पुरक पोषण घेऊ शकत नाहीत आणि कमजोर होतात. या कारणानेच केसगळती होऊ लागते.

...आणि नेहमीसाठी टक्कल पडतं

या हार्मोनचं प्रमाण कामय राहिल्या कारणाने नवीन केसही येत नाही आणि शरीर फॉलिकल्सची स्पेस बंद करतं. पुरूषांमध्ये या हार्मोनची निर्मिती आयुष्यभर सुरूच राहते. त्यामुळे ते केसगळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येचे शिकार होतात.

मग सर्व पुरूषांचं टक्कल का पडत नाही?

(Image Credit : alarabiya.net)

ज्या पुरूषांना टक्कल पडण्याची समस्या होत नाही, त्यांच्या केसमध्ये दोन स्थिती त्यांना यापासून वाचवतात. पहिली ही की,  या पुरूषांमध्ये एंड्रोजन रिसेप्टर्स हार्मोन्सला कमी शोषूण घेतात आणि दुसरं हे की त्यांच्यात आनुवांशिक कारण नसतं.  

५० वयानंतर वाढतं टक्कल 

एका रिसर्चनुसार, ३५ वयापर्यंत दोन तृतियांश पुरूषांनी टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना केल्याचं मान्य केलं. तर ५० आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ८० टक्के पुरूषांनी केस पातळ होणे आणि टक्कल पडल्याचं मान्य केलं.


Web Title: Know why hair loss and baldness is more common in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.