शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चष्म्यामुळे चेहऱ्यावर पडलेले डाग असे करा दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 12:34 IST

आजकाल वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे तसेच टेलिव्हीजनसमोर बसून भरपुर वेळ घालवल्यामुळे अनेकांना चश्मा लागतो.

(image credit-allaboutvision.com)

आजकाल वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे तसेच टेलिव्हीजनसमोर बसून भरपुर वेळ घालवल्यामुळे अनेकांना चष्मा लागतो. तसंच काही जणांना आवड म्हणून चष्मा वापरायला आवडतं असतो. पण काही जणांना चष्मा लावल्यामुळे नाकावर खूणा तयार होतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर चेहरा खराब दिसतो. नाकावर, डोळ्यांच्या बाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याच्या भागांवर चष्म्याच्या आकारानुसार डाग पडत असतात. तुम्हाला सुध्दा हीच समस्या असेल तर  काही घरगुती घटकांचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावर असलेले डाग कोणताही खर्च न करता काढू शकता. तसेच अनेकदा बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रिम्स वापरून सुध्दा चेहऱ्यावरचे चष्म्यामुळे आलेले डाग तसेच राहतात.

(Image credit- vickyhow) 

मध 

चष्म्याच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध त्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता. मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात. 

बटाटा

बटाट्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले अनेक गुणधर्म असतात. यासाठी एका कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या आणि 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. असं आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल.

अ‍ॅलोवेरा

अ‍ॅलोवेराचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अ‍ॅलोवेरा जेल हातावर घेऊन डोळ्यांच्या आजूबाजूला लावून गोलाकार फिरवा. त्यामुळे चष्म्याच्या वापरामुळे आलेले डाग निघून जाण्यास मदत होईल. 

गुलाबपाणी

गुलाब पाण्याचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी उपयोग करण्यात येतो. कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.

टोमॅटो

टोमॅटो, व्हिनेगर या पदार्थांच्या सहाय्याने डाग कमी करता येतात. हे पदार्थ स्किनवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डागांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. हे पदार्थ दररोज डागांवर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स