(Image Credit : Twitter)
चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. यासाठी महागड्या क्रीम्स आणि ब्यूटी ट्रिटमेंट्सची करतात. पण चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्याचं रंग उजळवण्यासाठी तुम्हाला महागड्या क्रीम्सवर खर्च करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला यासाठी गरज आहे फक्त एक बटाट, गुलाबजल आणि मधाची. या घरगुती उपायाने तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता.
पहिली पद्धत
चेहऱ्याचा काळपटपणा दूर करून ग्लो आणण्यासाठी बटाटा एक फायदेशीर आणि सोपा उपाय आहे. यासाठी एक छोटा बटाटा घ्या आणि चांगला धुवा. हा बटाटा किसून बारीक करा. हा किसलेल्या बटाट्याने चेहऱ्यावर दिवसातून दोनवेळा १० ते १५ मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. हे तुम्ही मानेवरही लावू शकता. जेव्हा हे कोरडं होईल तेव्हा चेहरा पाण्याचे धुवा आणि जे क्रीम तुम्ही वापरता ते लावा.
दुसरा उपाय
बटाट्याची एक स्लाइस बारीक करा. यात दोन थेंब गुलाबजल आणि काही थेंड मध टाका. हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनी चेहरा आणि मान पाण्याने धुवा. काही दिवस हा उपाय कराल तर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो आलेला बघायला मिळेल.
डेड स्कीन दूर करा
बटाट्याच्या मदतीने चेहरा आणि मानेवरील डेड स्कीन सेल्स दूर करतो. याने डार्कनेस कमी होऊन त्वचेवर ग्लो वाढतो. डार्क स्पॉट दूर करण्यासाठीही तुम्ही चेहरा आणि मानेवर बटाटा लावू शकता. जर तुम्ही त्वचा ऑयली असले किंवा तुम्हाला काळे डागांची समस्या असेल तर चेहऱ्यावर बटाट्याचा वापर करणे फायदेशीर ठरतं.
यामुळे वाढू शकतो ड्रायनेस
जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही चेहऱ्यावर फक्त बटाटा लावू नये. फक्त बटाटा लावला तर त्वचा आणखी ड्राय होऊ शकते. यासाठी बटाटा, गुलाबजल आणि मधाचा पॅक लावावा. यात मधाचे काही थेंब अधिक टाका. जेणेकरून त्वचा मुलायम होईल.
(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले किंवा टिप्स या घरगुती आहेत. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे काहींना याने अॅलर्जी होण्याचा धोकाही असू शकतो.)