(Image Credit : www.nykaa.com)
त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडरचा वापर केला जातो हे तुम्हाला माहीत असेलच. पावसाळ्यात त्वचेची खास काळजी घेण्यासाठी चंदन पावडर अधिक फायदेशीर ठरतं. पावसाळ्यात ओलावा अधिक राहतो, सतत भिजल्याने त्वचेत फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका राहतो. अशात चंदन अॅंटीसेप्टिक बनून त्वचेची रक्षा करण्यास मदत करतं. चंदनाचा वापर ग्लोइंग स्किनसाठीही केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊन चंदन पावडरचा वापर....
चंदन पावडर वापरण्याची पद्धत
त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी चंदन पावडर वापरण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. यासाठी तुम्हाला चंदन पावडर, चंदन तेल, बेसन, हळद आणि गुलाबजलची गरज लागेल. या सर्वच गोष्टी समान प्रमाणात मिश्रित करा.
आता तयार झालेली पेस्ट हलक्या हाताने त्वचेवर लावा. संपूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर एकसमान पेस्ट लागली पाहिजे. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. याने तुम्हाला लवकरच फायदा बघायला मिळेल.
डार्क सर्कल दूर करण्यासाठी चंदन पावडर
जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल असेल तर तुम्ही ही समस्या चंदन पावडरने दूर करू शकता. यासाठी चंदन पावडर, संत्र्याच्या सालीचं पावडर आणि गुलाबजल घ्या.
या तिन्ही वस्तू एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्या चांगल्याप्रकारे लावा. १० ते १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पेस्टचा वापर काही दिवस केल्याने डार्क सर्कल दूर होतील. त्यासोबतच या पेस्टचा नेहमी वापर केला जर चेहऱ्याची स्वच्छताही चांगली होऊ शकते.