How to apply mehandi in white hair : थंडीच्या दिवसात पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी लावणं अनेकदा नुकसानकारक ठरतं. कारण आधीच वातावरण थंड त्यात मेहंदीचा लेपही थंड. अशात सर्दी-खोकला होण्याची समस्या होते. त्यामुळे बरेच लोक या दिवसात मेहंदी लावणं टाळतात. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतली तर मेहंदी लावूनही सर्दी-पडसा होणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.
थंडीत कशी लावाल मेहंदी?
- हिवाळ्यात केसांना मेहंदी उन्हात बसून लावावी. तर मेहंदीचा लेप गरम पाण्याने तयार करावा. असं केल्याने तुम्हाला सर्दी होणार नाही.
- जर धुक्यामुळे उन्ह पडत नसेल आणि तुम्हाला अर्जंटमध्ये कुठेतरी जायचं असेल तर मेहंदीचा लेप गरम पाण्यात वेळ ठेवावा. त्यानंतर केसांना लावा. याने डोक्याला गरमी मिळेल आणि सर्दी होणार नाही.
- गरम पाण्यासोबतच तुम्ही रूम हीटर समोरही मेहंदी ठेवू शकता. याने मेहंदी गरम होईल. तसेच मेहंदी सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करावा.
- सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मेहंदी सुकल्यानंतर केस गरम पाण्याऐवजी नॉर्मल पाण्याने धुवावे. यानेही सर्दी होणार नाही.
- कोमट पाण्यात मेहंदी भिजवून लावणे, तेल लावणे हा थंडीपासून बचावाचा सगळ्यात सोपा उपाय आहे.