रात्री केस धूत असाल तर पडू शकतं महागात... जाणून घ्या का खराब होतात केस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 07:53 PM2019-11-30T19:53:33+5:302019-11-30T20:03:49+5:30

सध्याचे व्यस्त दैनंदिन जीवन जगत असताना कोणतंही काम करायच असेल. तरी वेळेची कमतरता जाणवते.

How to take care of your hairs | रात्री केस धूत असाल तर पडू शकतं महागात... जाणून घ्या का खराब होतात केस

रात्री केस धूत असाल तर पडू शकतं महागात... जाणून घ्या का खराब होतात केस

googlenewsNext

(Image credit- intheco.com)

सध्याचे व्यस्त दैनंदिन जीवन जगत असताना कोणतंही काम करायच असेल. तरी वेळेची कमतरता जाणवते. त्यामुळे ठरवलेली कामं ठरवलेल्या वेळेत होत नाही. अनेक महिला या सकाळी सकाळी केस धुतात. तर काहीजणी या सकाळी उठल्यानंतर घाई होऊ नये. म्हणून रात्रीच केस धुतात. पण रात्री केस धुतल्याने काही समस्यांचा सामना करावा लागतो.  त्यांमुळे त्वचेचे तसेच केसांचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया रात्री केस धुतल्यास कोणत्या परीणामांना सामोरे जावे लागु शकते.  


 (image credit- HT)

रात्री केस धुतल्याने केसांची मुळं ही कमजोर होतात. त्यामुळे केस गळायला लागतात. रात्री केस धुवून झोपल्यानंतर केसात गुंता होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे केस कंगव्याने विंचरताना मोठ्या प्रमाणात तुटतात. यामुळे केसांचे होणारे नुकसान टाळण्यसाठी केस रात्री धुणे टाळा.


रात्री केस धुतल्यानंतर ते ओले असतात. त्यामुळे केस रुक्ष पडून कोरडे पडण्याची शक्यता असते. केस धुतल्यानंतर जर ते  नीट सुकले नाही. तर केसांमध्ये आणि स्काल्पवर ईन्फेक्शन होण्याची शक्याता असते. जर ते ईन्फेक्शन पसरले तर केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात. आणि डोक्यात खाज येणे कोंडा होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. धुतलेले केस जास्त वेळ ओले राहीले तर सर्दी , ताप यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. अ‍ॅलर्जीही निर्माण होऊ  शकते. 

(Image credit- Khubsurati.com)

तसेच शांपू, कंडिशनर, यांच्या जास्त  वापराने केस कोरडे होतात. डोक्यावरील त्वचासुद्धा आजारी पडते. केसांची मुळे नष्ट होतात. केस पातळ होऊन टक्कल लवकर पडू शकते. केस लवकर पिकतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी  रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक यांचे सेवन केल्याने केस चांगले राहतात.

Web Title: How to take care of your hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.