त्वचेवरील नको असलेले केस दूर करण्यासाठी आणि मुलायम त्वचा मिळवण्यासाठी वॅक्सिंग करणं फायदेशीर असतं. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स उपलब्ध आहेत. पण पैसे खर्च न करता तुम्ही घरीही वॅक्स तयार करू शकता. घरीच तयार केलेलं वॅक्स त्वचेच्या दृष्टीने फायदेशीरही ठरतं. कारण बाजारातील वॅक्समध्ये केमिकल्स असल्याने त्वचेला हानी पोहोचण्याचाही धोका असतो. केवळ मध, लिंबू आणि साखरेच्या मदतीने तुम्ही घरीच वॅक्स तयार करू शकता. चला जाणून घेऊ वॅक्स तयार करण्याची पद्धत....
घरीच वॅक्स तयार करण्याची पद्धत
१) एका पॅनमध्ये एक कप साखर गरम करा आणि साखरेचं पाणी होईपर्यंत ती गरम करा.
२) साखर वितळल्यावर त्यात मध आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण गरम करा आणि गरम करताना चमच्याने फिरवत रहा. काळजी घ्या की, हे मिश्रण फार पातळ होऊ नये.
३) जर मिश्रण फार जास्त घट्ट झालं तर त्याल थोडं पाणी टाका.
४) जेव्हा वॅक्स तयार होईल तेव्हा गॅस बंद करा आणि वॅक्स एक तासासाठी तसंच राहू द्या. याचं तापमान रूमच्या तापमानाऐवढं असावं.
५) जेव्हा वॅक्स थंड होईल तेव्हा एका बॉक्समध्ये टाकून फ्रिजमध्ये स्टोर करा.
या वॅक्सचे फायदे
1) या वॅक्समध्ये नैसर्गिक तत्व जसे की, मध, लिंबू असतात. यातील अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम राहते.
२) या घरगुती वॅक्सचा वापर केला तर त्वचेवर रॅशेज आणि इन्फेक्शन होण्याचा धोका नसतो. पार्लरच्या वॅक्सप्रमाणे हा वॅक्स अनेकांनी वापरलेला नसतो.
३) घरी तयार करण्यात आलेल्या वॅक्समध्ये मध असतं. जे त्वचेला पूरेसं मॉइश्चर करतं. ज्यामुळे वॅक्स केल्यावर त्वचा रखरखती होत नाही.
४) या वॅक्सने त्वचेवरील धुळ, मृत पेशी दूर केल्या जातात. त्यामुळे त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचा तजेलदार दिसू लागते.
(टिप : वरील टिप्स आणि उपाय फॉलो करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काहींना हे सूट होईल असं नाही.)