शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

उन्हाळ्यात त्वचेचं रक्षण करण्यासाठी होममेड पील ऑफ मास्क करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:53 IST

घरातून बाहेर पडल्यावर तुमचा सामना हा धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी होतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवरील सेल्स नष्ट होतात.  

(Image Credit : superdicasartvitta.com.br)

घरातून बाहेर पडल्यावर तुमचा सामना हा धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी होतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवरील सेल्स नष्ट होतात.  या डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी आणि चेहऱ्यावर पुन्हा ग्लो आणण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण अनेकदा यांमुळे त्वचेचा उजाळा नाहीसा होतो. अशावेळी निस्तेज त्वचेपासून सुटका करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी पील ऑफ मास्क फायदेशीर ठरत. आता तुमही म्हणाल की, बाजारात मिळणाऱ्या पील ऑफ मास्कमध्ये अनेक केमिकल्स असतात. अशावेळी तुम्ही घरीदेखील पील ऑफ मास्क तयार करून तुमच्या चेहऱ्याचा हरवलेला ग्लो पुन्हा मिळवू शकता. 

पील ऑफ मास्कचे फायदे :

1. होममेड पील ऑफ मास्कचा वापर केल्याने स्किनवर जमा झालेली घाण, बॅक्टेरिया आणि खराब सेल्सला काढून टाकण्यासाठी मदत करतो. याचबरोबर चहऱ्यावर ग्लो येतो. एका आठवड्यामध्ये जर तुम्ही दोन वेळा मास्कचा वापर केला तर तुम्ही आणखी सुंदर दिसू शकता. 

2. चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी पील ऑफ मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. मास्कचा वापर केल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि स्किनवर नवीन लेयर येते. तसचे चेहऱ्याची त्वचा तजेलदार दिसू लागते. 

3. पील ऑफ मास्कचा वापर केल्याने स्किन सॉफ्ट आणि टाइट होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हा मास्क ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. 

4. पील ऑफ मास्कमध्ये फळांचा वापर करण्यात येतो. फळांमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नसतात. 

घरीच तयार करा पील ऑफ मास्क 

एग व्हाइट फेस मास्क 

हा मास्क चेहऱ्यावरील काळे डाग स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. हे तयार करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि यामध्ये पीठी साखर एकत्र करा. यानंतर हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यावर टिशू पेपर लावा. आता टिशू पेपरवर पुन्हा ते मिश्रण लावा. हे सुकल्यानतर टिशू पेपर काढून टाका. ज्यामुळे काळे डाग दूर होण्यास मदत होइल तसेच डेड स्किन सेल्स निघून जातील. 

(Image Credit : Eat This, Not That!)

ग्रीन टी आणि लेमन फेस मास्क 

हा मास्क तयार करण्यासाठी ग्रीन टी पाण्यामध्ये एकत्र करा आणि त्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा. त्यानंतर यामध्ये थोडी जिलेटीन पावडर एकत्र करा. त्यानंतर काही वेळासाठी ओव्हनमध्ये ठेवा आणि व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर लावून घ्या. काही वेळासाठी तसचं ठेवा. मिश्रण सुकल्यानंतर ते काढून टाका. 

ऑरेंज पील फेस मास्क 

ऑरेंज पील फेस मास्क तयार करण्यासाठी संत्र्याच्या साली उन्हामध्ये कमीत कमी दोन दिवस सुकवून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर गॅसवर मंद आचेवर एक कप पाणी उकळून त्यामध्य साखर एकत्र करा. पाणी आटल्यानंतर त्यामध्ये संत्र्याच्या सालींची पावडर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे सुकल्यानंतर काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत होते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSkin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स