सध्या नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड बॉलिवूड अभिनेत्रींसह इतरही अनेक महिलांमध्ये दिसून येत आहे. असं तेव्हाच शक्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी योग्य पद्धतीने घ्याल. आपल्या त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी आणि त्वचेचा उजाळा वाढविण्यासाठी डिटॉक्स मास्क घरीच तयार करू शकता. त्यामुळे मिनिटांमध्ये उजळलेली त्वचा मिळण्यास मदत होईल.
का गरजेचं आहे त्वचा डिटॉक्स करणं?
शरीरासोबत त्वचा डिटॉक्स करणं आवश्यक असतं. प्रदूषण, जास्त मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावर हानिकारक बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे पिंपल्स येणं, त्वचा आणि ओठांवरील त्वचा कोरडी होणं तसेच ब्लॅक हेड्ससारख्या प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्वचा हेल्दी आणि प्रॉब्लेम्स फ्री ठेवण्यासाठी महिन्यातून कमीत कमी 2 वेळा स्किन डिटॉक्स करणं गरजेचं असतं. स्किन डिटॉक्स फक्त तणाव आणि प्रदूषण दूर करत नाही. तर त्वचेची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठीही मदत करतं.
जाणून घेऊया स्किन डिटॉक्स करण्यासाठी होममेड फेस मास्क...
कॉफी आणि मड मास्क
कॉफी आणि मड मास्क तयार करण्यासाठी 2 चमचे मातीमध्ये एक चमचा कॉफी पावडर एकत्र करा. आता या मिश्रणामध्ये थोडसं सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करा. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर सफरचदाचं व्हिनेगरचा वापर कमी करा. हे चेहरा आणि मानेवर लावून 10ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर ताज्या पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील विषारी टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते आणि स्किन एक्सफॉलिएटर होते. त्याचबरोबर यामध्ये असलेले अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचा पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी मदत करते.
ग्रीन टी आणि मधाचा मास्क
ग्रीन टी आणि मध एकत्र करू एक घट्ट पेस्ट तयार करा. तयार पेस्ट मान आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी लावून तसचं ठेवा. त्यानंतर हे पाण्याच्या मदतीने व्यवस्थित स्वच्छ करा. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे त्वचा डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर यामुळे त्वचा नितळ आणि सुंदर होण्यास मदत होते.
कोकनट क्ले मास्क
कोकनट क्ले मास्क तयार करण्यासाठी 2 चमचे बेंटोनाइट क्ले मास्कमध्ये एक चमचा कोकनट ऑइल आणि मध एकत्र करा. तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा हायड्रेटिंग मास्क त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासोबतच पो,णासाठीही मदत करेल.
ग्रेप फ्रूट आणि ओटमील मास्क
हा फ्रूट मास्क तयार करण्यासाठी ग्रेप फ्रूट पल्पमध्ये ओटमील एकत्र करा. त्यानंतर यामध्ये थोडसं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. आता तयार पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावा. यामध्ये असलेलं लॅक्टिर अॅसिड त्वचा डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यासाठीही मदत करतो.
अवोकाडो लेमन मास्क
त्वचा डिटॉक्स करण्यासोबतच हा मास्क त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतो. यासाठी 2 टेबलस्पून अवोकाडो पल्समध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा वर्जिन कोकोनट ऑइल एकत्र करा. तयार मिश्रण 20 मिनिटांसाठी चेहरा आणि मानेवर लावा. आठवड्यातून कमीत कमी एक वेळा या मास्कचा वापर करा. त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. (टिप: वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)