केसांच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय; एकदा वापरून पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 06:22 PM2019-02-25T18:22:33+5:302019-02-25T18:23:19+5:30

सध्या प्रदूषणरहित वातावरणामुळे स्किन आणि केसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच दिवसभराची धावपळ आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्याकडेही लक्ष देणं शक्य होत नाही.

Hair care tips 4 easy ways to fight hair problems by using aloevera | केसांच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय; एकदा वापरून पाहाच!

केसांच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय; एकदा वापरून पाहाच!

googlenewsNext

सध्या प्रदूषणरहित वातावरणामुळे स्किन आणि केसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच दिवसभराची धावपळ आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्याकडेही लक्ष देणं शक्य होत नाही. अशातच आपल्यापैकी अनेक लोक बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा आधार घेत असतात. या उत्पादनांमध्ये अनेक केमिकल्सचा वापर करण्यात येत असून अनेकदा यांच्या साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही केस लांब, दाट आणि काळे करू शकता. त्यामुळे थोडासा वेळ काढून या उपायांच्या मदतीने तुम्ही केसांचं सौंदर्य वाढवू शकता. 

1. केस गळण्याची समस्या

जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. यामुळे फक्त केस गळण्याचं प्रमाणच कमी होणार नाही तर केस दाट होण्यासही मदत होइल. फक्त एवढचं करा की, हेअर वॉश करताना शॅम्पूसोबत कोरफडीचाही वापर करा. केस धुताना केसांमधून सर्व कोरफडीचा गर निघून जाइल याची काळजी घ्या. आठवड्यातून 2 वेळा असं केल्याने केस गळण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होइल. 

2. कोरड्या केसांची समस्या दूर होण्यास मदत 

बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि केमिकल्स असणाऱ्या कंडिशनर ऐवजी नैसर्गिक उपाय म्हणून कोरफडीचा वापर करा. शॅम्पूशिवाय कोरफडीचा गर केसांना लावून मसाज करा, 3 ते 4 मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर पाण्याने केस धुवून टाका. असं केल्याने केस मुलायम होण्यास मदत होइल. हा प्रयोग आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा करा. 

3. केसांच्या वाढीसाठी

दाट केसांसाठी केसांचं आरोग्य राखणं आवश्यक असतं. यासाठी कोरफडीमध्ये मेथीचे काही दाणे, तुळशीची पावडर आणि 2 चमचे कॅस्टर ऑइल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांमध्ये लावा आणि एका तासासाठी तसचं ठेवा. यानंतर केसांना शॅम्पूने धुवून टाका. प्रत्येक आठवड्यात 2 वेळा असं केल्याने एका महिन्यामध्ये केसांच वाढ चांगली होते. 

4. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी

जर सर्व उपाय केल्यानंतरही केसांमधील कोंडा दूर होत नसेल तर एकदा कोरफडीच्या गराचा वापर करा. फ्रेश कोरफडीचा गर डोक्याच्या त्वचेला लावून संपूर्ण डोक्याला मसाज करा. जवळपास एक तासासाठी तसंच ठेवा आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका. काही दिवसांमध्ये केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. 

Web Title: Hair care tips 4 easy ways to fight hair problems by using aloevera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.