शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

उत्तम आरोग्यासाठी झोपेचे वेळापत्रक आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 20:15 IST

आजच्या या धावपळीच्या युगात अनेकांना हे वेळापत्रक पाळणे शक्य होत नाही. त्यामुळेच आजाराचे प्रमाण हे वाढत आहे.

 एकवेळेला जेवण नसले तरी चालू शकते. परंतु, रात्रीला शरीरासाठी झोप ही अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता नियत्यनियमाने दररोज रात्रीला झोपण्याचे व सकाळी उठण्याचेही वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे. अन्यथा विविध  प्रकाराच्या आजारांना  सामोरे जावे लागते.दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या व्यापामुळे अनेकांचे वेळेवर झोपणे होत नाही. दररोज झोपण्याचा वेळ बदलत असल्याने, सकाळी वेळेवर उठणे शक्य होत नाही. त्यामुळेच विविध समस्या उद्भवतात त्याची ही माहिती.अपुºया झोपेचे तोटेरात्रीला शरीराला सहा ते आठ तास झोप ही आवश्यक आहे. पुरेशी झोप झाली नाही तर बीपी, थॉयराईड आदी शारीरिक आजार उद्भवतात. चेहºयावर उत्साह राहत नाही. आॅफिसमध्ये व वाहन चालवितानाही झोप येते. रात्री उशीरापर्यंत टी.व्ही. बघीतल्याने पचनासंबंधी विविध आजार होतात.  नेहमी मानसीक दुर्बलता आल्यासारखे वाटते. त्यामुळे आपली पर्सनॉलिटीही उठवून दिसत नाही. याचा सर्व परिणाम हा आपल्या कामाच्या ठिकाणीही होऊन,आपला रेकॉर्ड सुद्धा खराब होऊ शकतो.जास्त झोपेचे तोटेलवकर उठणे व लवकर झोपणे ही आरोग्यासाठी उत्तम सवय आहे. परंतु, अनेकजण रात्रीला लवकर झोपूनही सकाळी वेळेवर उठत नाही. त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्याकरिता सूर्यादयासोबत उठणे हे आवश्यक आहे.काय घ्यावी काळजीझोपेसंबंधी काळजीही घेणे आवश्यक आहे. त्याकरिता जेवणानंतर ताबडतोड  काहीजण झोपी जातात. हे चांगले लक्षण नसून,जेवणानंतर एक ते दीड तासाने झोपावे. झोपण्याूपर्वी थोडे पायी चालावे.  जास्त झोप व कमी झोप हे एक मानसीक आजाराचे लक्षण आहे. लहान मुलांना सुद्धा झोपेच्या विविध समस्या अलीकडे निर्माण होत आहे. त्याकरिता पालकांनी सजग होणे गरजेचे आहे.  झोपेसंबंधी कोणतीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.मोबाईल, टीव्हीचा दुष्परिणामआजघडीला मोबाईल व टी.व्ही. सुद्धा झोपेला मोठा अडथळा ठरत आहे. रात्री उशीरापर्यंत टीव्हीवरील कार्यक्रम बघीतले जातात. त्यामुळे कुटुंबातील सर्वचजण जागी राहतात. तसेच मोबाईल घरात मुलाच्या हाती दिल्याने ते रात्री उशीरापर्यंत मोबाईलवरच गेम खेळण्यात गुंतलेले असतात. झोपेची वेळ होऊनही ते झोपत नाहीत. या अशा बदलत्या जीवनशैलीमुळेही आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो.घोरणेझोपेत कुणी घोरत असेल तर आपण काय शांत झोपला अशी सहज त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो. परंतु, हे घोरणे आरोग्याला फार घातक आहे. ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्ट अटॅक यासारखे घोरण्यामुळे आजार जडू शकतात. त्यामुळे या घोरण्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. झोपेत घोरण्याºया व्यक्तिचे कंठ बंद होऊन, शरीराला मिळणाºया आॅक्सीजनचे प्रमाण हे कमी होते. श्वास थांबल्याने हा आवाज होतो, इतरानाही या घोरण्याचा त्रास होतो. तसेच स्वत : दचकून जाग येते व एकाग्रताही राहत नाही. मूडही सतत बदल असतो. तसेच घसा व तोंड कोरडे पडते. घोरणे हाआजार नाही असा आजही समाजात गैरसमज आहे. त्यामुळे आजही त्याच्याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले जात नाही. म्हणून दिवसेंदिवस हा आजार बळावत चालला आहे. त्याकरिता आरोग्य विभागाने जनजागृती करणे आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये रात्रीला झोपेत कुणी असे घोरत असेल तर उपचार करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा हा आजार बळावतो. त्याकरिता वेळीच पावले उचलावीत.