शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मोहरीच्या तेलात लसूण मिक्स करून शरीरावर लावण्याने काय होतात फायदे? वाचून लगेच कराल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 12:17 IST

Mustard Oil and Garlic benefits for skin : जर तुम्ही ५० मिली मोहरीच्या तेलात ४ ते ५ लसणाच्या कळ्या गरम करून शरीराची मालिश केली तर मांसपेशीच्या दुखण्यातून तुमची सुटका होईल.

Mustard Oil and Garlic benefits for skin : मोहरीच्या तेलामध्ये भरपूर औषधी गुण असतात. या तेलाचा वापर कंबरदुखी, मानदुखी, हात-पाय किंवा खांदेदुखी दूर करण्यासाठी आणि डोक्याची मालिश करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही ५० मिली मोहरीच्या तेलात ४ ते ५ लसणाच्या कळ्या गरम करून शरीराची मालिश केली तर मांसपेशीच्या दुखण्यातून तुमची सुटका होईल. कारण मोहरीचं तेल आणि लसूण दोन्ही गोष्टी गरम असतात. त्यासोबत या दोन्ही गोष्टींचे इतरही अनेक फायदे असतात. तेच जाणून घेऊया.

लसूण आणि मोहरीच्या तेलाचे फायदे

त्वचा होईल चमकदार

त्वचा ग्लोईंग करण्यात या दोन्ही गोष्टींची मदत मिळते. याने त्वचा उजळते आणि चमकदार दिसते. यातील तत्वांमुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि चेहरा मॉइश्चराइज होतो. ज्यामुळे त्वचेवर खाज येण्याची समस्या होत नाही.

सर्द-खोकला होईल दूर

मोहरीचं आणि लसणाच्या मिश्रणाने शरीराला उष्णता मिळते. याने बंद झालेलं नाक मोकळं होतं. तसेच श्वास घेण्यासंबंधी समस्याही दूर होते. लसणात अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-ऑक्डिेंट्स गुण असतात, जे इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत करतात.

थकवा दूर होईल

मोहरीच्या लसूण मिक्स करून शरीराची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि तुम्हाला सतत फ्रेश वाटतं. या तेलाने मालिश केल्यावर संधिवात आणि सूज या समस्याही दूर होतात.

संधिवात होईल दूर

या तेलाने नियमितपणे मालिश केल्याने संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत मिळते. कारण यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

दातांचं दुखणं होईल दूर

दातांमध्ये वेदना होत असेल तर या तेलाने तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी लसूण आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट वेदना होत असलेल्या जागी लावा. याने आराम मिळेल. 

केस होतील मजबूत

लसूण आणि मोहरीच्या तेलाच्या मिश्रणाने केस मजबूत होतात आणि दाटही होतात. ज्या लोकांना केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या असतील त्यांना या तेलाने मालिश करावी. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स