चिमुकल्याची कुत्र्याशी मैत्रीचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 20:27 IST
आपले एकटेपण घालविण्यासाठी आजघडीला सर्वच जणांना सोशल मिडीया हा एक मोठा पर्याय आहे
चिमुकल्याची कुत्र्याशी मैत्रीचा व्हिडीओ
आजच्या तरुणाईसह अनेकजण आपल्याला तासन्तास सोशल मिडीयावरच दिसून येतात. परंतू, अमेरिकेत एक मुलगा आपले एकटेपण घालविण्यासाठी चक्क कुत्र्याशी मैत्री करतो. नुकताच फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील हॉली ब्रियॉक्स मालेट या फेसबुक युजर्सने आपल्या प्रोफाईलवर तो अपडेट केला आहे. त्यामध्ये एक ९ वर्षाचा मुलगा त्यांची घरी कुणी नसताना दररोज येऊन, कुत्रा बेलाला प्रेमाने मिठी मारुन जायाचा. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेºयातही हा प्रकार कैद झाला होता. हा मुलगा कोण व आपल्या कुत्र्याला दररोज मिठी मारुन का जातो असा त्यांना प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला. त्यांच्याच घरा शेजारी असणाºया महिलेने तो मुलगा आपला असल्याचे सांगितले. मालेट दांपत्यानी त्या मुलाची चौकशी केली असला त्याचे नाव जोश असल्याचे कळाले. त्याच्याकडेही एक पाळीव कुत्रा होता. तो एकटेपण घालविण्यासाठी त्याच्यासोाबत दररोज खेळायचा. परंतु, त्या कुत्राचा अचानक मृत्यू झाल्याने, तो एकलकोंडा बनत होता. त्यामुळे त्याला शेजारच्या बेल या कुत्राचा नवा पर्याय मिळाला. या व्हिडीओची फेसबुकला सर्वात जास्त चर्चा होत आहे. तीन कोटीपेक्षा अधिक लोकांनी तो पाहीला असून, ५० हजार कमेंटस, सव्वाचार लाखांपेक्षा जास्त युजर्संनी तो शेअर केला आहे. एकटेपण घालविण्यासाठी हा सुद्धा पर्याय असल्याचे यावरुन स्पष्ट होते.