शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Fashion : फेटा - फॅशनचा नवा ट्रेंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 17:08 IST

फेट्यांमुळे स्त्रीयांच्या सौदर्यात अधिकच भर पडताना दिसत आहे.

बहुतेक जुन्या मराठी चित्रपटात रुबाबदार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी फेट्यांचा वापर केला जायचा. रांगडा पुरुष, पिळदार शरीरयष्टी, झुपकेदार मिशा आणि कोरीव दाढी असलेला अभिनेता फेट्यामध्ये अधिकच रुबाबदार आणि आकर्षक दिसायचा. अगोदर फेटा फक्त पुरुषच परिधान करायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. फेट्याला आज फॅशनचा एक भाग समजला जात आहे. विशेषत: स्त्रीयाही पुरुषाच्या बरोबरीने फेटा बांधायला लागल्या आहेत. या फेट्यांमुळे त्यांच्या सौदर्यात अधिकच भर पडताना दिसत आहे. लग्नसोहळा, शोभायात्रा आदी प्रसंगीतर स्त्रीयांचा हा वेगळा ढंग हमखास पाहायला मिळतो.अंगात नऊवारी साडी, पायात कोल्हापुरी चप्पल, कमरेवर कमरपट्टा, डोळ्यांवर रंगीत गॉगल, भाळावर चंद्रकोर आणि डोक्यावर फेटा असेल तर अशा स्त्रीला पाहून आपसुकच तोंडातून वाह..! हा शब्द निघाला नाही तरच नवलं.पूर्वी विशिष्ट रंगाचेच फेटे पाहायला मिळायचे. आता मात्र वेगवेगळ्या रंगांचे आणि स्टाइलचे फेटे बाजारात सहज उपलब्ध आहेत. 'फेट्याच्या बांधणीनुसार त्यात निरनिराळे प्रकार उपलब्ध आहेत. तरीही पुणेरी किंवा कोल्हापुरी स्टाइलच्या फेट्यांना अधिक मागणी आहे. शिवाय आता बाजाराच आयते फेटेही मिळतात. त्यामुळे बांधायला येत नसेल तरी तुम्ही ऐटदार फेटा नक्कीच घालू शकता.  फेट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यातही आता खूप फरक पाहायला मिळत आहे. आधी केवळ कॉटनच्या कपड्याला स्टार्च करून फेटा बांधला जायचा. मात्र आता साडीच्या फेट्याचा ट्रेंड अधिक आहे. जरीची बॉर्डर असलेल्या किंवा अगदी पारंपरिक काठा-पदराच्या सहावारी किंवा नऊवारी साड्यांचा फेटा अनेक जण बांधतात. त्याचबरोबर 'बांधणी फेटा' हा देखील अत्यंत प्रसिद्ध होतो आहे. लाल, हिरव्या, पिवळ्या किंवा मिश्र रंगसंगतीतला बांधणी फेटा एक भारी लूक नक्कीच देऊ शकतो. कोल्हापुरी स्टाईलच्या फेटेबांधणीत 'लहरिया' फेटा अधिक प्रसिद्ध आहे.