(Image Credit : Health Magazine)

आजकाल महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी पार्लरमध्ये जाणं पसंत करतात. वेळोवेळी महिला पार्लरमध्ये जाऊन काहीना काही करत असतात. काही महिला ब्लीच करतात तर काही महिला आणखी काही करत असतील. ब्लीचिंगमुळे चेहरा खुलतो आणि चेहऱ्यावरील केसही नाहीसे होतात. 

सध्या प्रदूषणामुळे त्वचेची अधिक काळजी घेणंही महत्वाचं झालं आहे. प्रत्येकाच्याच त्वचेवर ब्लीचिंगने फायदा होईल हे गरजेचं नाही. कारण यात वापरलं जाणारं केमिकल फार स्ट्रॉंग असतं. त्यामुळे काहींच्या त्वचेवर याने खाज आणि जळजळ होऊ शकते. तसेच बदलत्या वातावरणामुळेही त्वचेवर खाज येऊ शकतं. अशात या समस्येला दूर करण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अ‍ॅलोव्हेरा

अ‍ॅलोव्हेरा जेल हे त्वचेसाठी किती फायदेशीर असतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. याचा नियमित वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर होता. काही महिलांची त्वचा फार संवेदनशील असते आणि ब्लीचिंगनंतर त्यांना खाज आणि त्वचेवर आग होण्याची समस्या होते. त्यांनी अ‍ॅलोव्हेराचा नियमित वापर करावा. त्वचेची आग होत असेल तर अ‍ॅलोव्हेरा जेल लावा आणि थोडा वेळ मालिश करा. ५ मिनिटे असं करून चेहरा थंड पाण्याने धुवावा. 

खोबऱ्याचं तेल

(Image Credit : Verywell Health)

खोबऱ्याच्या तेलातही ब्लीचिंगची इंचिग दूर करण्याचा गुण असतो. याचा त्वचेवर वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. अशात ब्लीच केल्यावर खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावा, काही वेळाने खाज किंवा आग दूर होईल. खोबऱ्याच्या तेलात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगस गुण भरपूर असतात. त्यामुळे त्वचेला याने अनेक फायदे होतात.

दुधाचे त्वचेला होणारे फायदे

(Image Credit : Hira Beauty Tips)

दुधाचे देखील त्वचेसाठी अनेक फायदे होतात. तसेच आरोग्यही चांगलं राहतं. कच्च दूध त्वचेसाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने चेहऱ्यावर चमक येते. दुधात प्रोटीन, कॅल्शिअम आणि भरपूर चिकट तत्व असल्याने त्वचेचं सौंदर्य आणखी खुलतं. त्वचेवर थंड दूध लावल्याने त्वचेवरील आग होण्याची आणि खाज येण्याची समस्या सहज दूर होते.

Web Title: Face skin itching? Then try these 3 best home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.