चेहऱ्यावरील तीळ असा करा दूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 15:53 IST
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्यावर असलेला एखादा तीळ महत्त्वाची भूमिका बजावितो. हेच तीळ जास्त प्रमाणात असतील तर मात्र सौंदर्यात बाधा निर्माण होते.
चेहऱ्यावरील तीळ असा करा दूर !
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्यावर असलेला एखादा तीळ महत्त्वाची भूमिका बजावितो. हेच तीळ जास्त प्रमाणात असतील तर मात्र सौंदर्यात बाधा निर्माण होते. अशावेळी हे नको असलेले तीळ दूर करण्यासाठी मुली अनेक पर्याय करताना दिसतात. परंतु त्याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होताना दिसते. काही घरगुती पर्याय अवलंबिले तर हे तीळ कायमचे नष्ट होऊ शकतात. * तीळ घालविण्यासाठी फुलकोबी अत्यंत उपयुक्त आहे. याचा रस तीळ असलेल्या ठिकाणी सतत लावल्यास काही दिवसातच परिणाम दिसून तीळ हळूहळू नाहीसे व्हायला लागते. * कोथिंबिरीच्या पानांची पेस्ट करुन तिळावर लावल्यास काही दिवसातच तीळ नाहीसे होण्यास मदत होते. * तीळ घालविण्यासाठी लसणाचाही उपयोग होतो. यासाठी लसणाची पेस्ट बनवून रोज रात्री तिळावर लावा. त्यावर बँडे़ज लावा. सकाळी उठून त्वचा गरम पाण्याने धुवा. याने नक्कीच तीळ जाण्यास हातभार लागतो. * तीळ जाण्यास एरंडेल तेलही महत्त्वाचे आहे. तिळाच्या ठिकाणी एरंडेल तेलाने मसाज केल्याने तीळ नेहमीसाठी गायब होतील.* व्हिनेगरचाही चांगला फायदा होतो. यासाठी तीळ असलेली त्वचा गरम पाण्याने धुवून कापसाने व्हिनेगर तिळावर लावा. १० मिनिटांनी त्वचा गरम पाण्याने धुवा.* मध आणि सूर्यफुलाच्या बियादेखील तीळ दूर करण्यास मदत करतात. यासाठी मध व सूर्यफुलाच्या बियांचे तेल मिक्स करुन रोज ५ मिनिटे तिळावर घासा. यामुळे तीळ तर गायब होईलच सोबतच त्वचादेखील चमकायला लागेल.