Hair Care Tips : डोक्यावरील केस विरळ होण्याची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. त्यामुळे कमी वयातच लोकांचं टक्कल पडतं. महिलांना सुद्धा केसगळतीसारख्या समस्येचा सामना करावा लागतो. केसांची वाढ करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागेल. जेव्हाच केसांची वाढ होईल. अशात एक्सपर्टनी एका अशा खास तेलाबाबत सांगितलं आहे, ज्याच्या मदतीनं केसांची वाढ करता येऊ शकते. सोबतच केसांसंबंधी इतर समस्याही दूर करता येतात.
एक्सपर्ट सांगतात की, रोजमेरी ऑइल केसांची वाढ होण्यासाठी बेस्ट नॅचरल उपाय आहे. रोजमेरी तेलांमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आणि ब्लड सर्कुलेशन वाढवणारे गुण असतात. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि त्यांची वाढ होण्यास मदतही मिळते. काही दिवसांआधी इन्स्टाग्रामवर डॉ. कुणाल सूज यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती रोजमेरी तेलानं केसांची वाढ कशी होईल हे सांगताना दिसत आहे.
डॉ. कुणाल यांनी हा व्हिडीओ शेअर करून रोजमेरी तेल आणि हेअर ग्रोथबाबत सांगितलं. ते म्हणाले की, 'रोजमेरी तेलानं मिळणारे फायदे काही नवीन नाही. कारण या तेलाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. केसांची वाढ करण्यासाठी हे तेल वापरलं जातं.
'जर तुम्ही केसांची वाढ करण्यासाठी नॅचरल उपाय शोधत असाल तर रोजमेरी तेल एक चांगला पर्याय ठरू शकतं. सोबतच डोकेदुखी, झोप न येणे, तणाव दूर करण्यासाठी सुद्धा हे तेल फायदेशीर ठरतं'.
डॉ. कुणाल म्हणाले की, 'रोजमेरी तेलानं डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन सुधारतं. ज्यामुळे रोमछिद्रांना न्यूट्रिशन मिळतं. अशात केसांची वाढ होते. केस मजबूत होतात आणि केसगळतीही थांबते. महत्वाची बाब म्हणजे याचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत'.
डॉ. कुणालनं यांनी सांगितलं की, 'रोजमेरी तेलाचे काही थेंब डोक्यावर टाकून मालिश करण्याचा आणि काही तास तसंच राहू देण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, हे तेल तुम्ही इतर दुसऱ्या तेलासोबत किंवा शाम्पूमध्ये मिक्स करूनही लावू शकता. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाचा वापर करावा'.