फक्त तीन तासांत होणार अल्झायमर्सचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 20:06 IST
संशोधकांनी अशी रक्त चाचणी शोधून काढली आहे ज्याद्वारे केवळ तीनच तासांत ‘अल्झायमर्स’ हा आजार आहे की नाही कळू शकणार.
फक्त तीन तासांत होणार अल्झायमर्सचे निदान
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची झेप पाहून प्रत्येक जण थक्क होऊन जाईल. आता हेच बघा ना, संशोधकांनी अशी रक्त चाचणी शोधून काढली आहे ज्याद्वारे केवळ तीनच तासांत ‘अल्झायमर्स’ हा आजार आहे की नाही कळू शकणार.बायो-चिपवर आधारित ही रक्त चाचणी अत्यंत अचुकतेने ‘अल्झायमर्स’चे निदान करते. ज्या लोकांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असेल त्यांना या चाचणीमुळे खूप लाभ होणार आहे. डीएनएचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोलिक्युलर चाचणीच्या तोडीस तोडी ही नवीन आधुनिक रक्तचाचणी आहे. रक्ताच्या नमुन्यावर एकाच वेळी एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या चाचण्या यामध्ये केल्या जातात.इंग्लंडमधील रँडोक्स प्रयोगशाळेतील वैज्ञानिक एमा सी. हार्टे यांनी सांगितले की, अल्झायमर्सच्या शक्यतेचा अंदाज घेण्यासाठी प्रथमच बायो-चिप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या चाचणीची आजच्या काळात खूप गरज आहे. यामुळे आपण रुग्णांना वेळीच सजग करून वैद्यकीय उपचारांच्या योग्य त्या उपाययोजना करू शकतो.cnxoldfiles/span> रक्तातील प्रोटिनचा शोध घेण्यात येतो. अॅपोलिपोप्रोटिन जीन अनुवांशिकतेने पुढच्या पीढीमध्ये जात असतो. जर आईवडिलांपैकी एकापासून जर वारशाने अॅपोलिपोप्रोटिन मिळाले असेल तर अल्झायमर्सची शक्यता तिपटीने जास्त असते.