गाजर खाण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गाजराच्या मदतीने ते चेहऱ्याचं सौंदर्यही अधिक खुलवू शकतात. म्हणजे गाजराचा घरगुती फेसपॅक तयार करून तुम्ही गुलाबी गाल मिळून शकता आणि या गुलाबी गालांनी सौंदर्यात अधिक भर घालू शकता. सध्या गाजराचा मोसम आहे. तर याचा फायदा तुम्ही आता घेऊ शकता.
ग्लोइंग त्वचेसाठी गाजर
उन, धूळ, प्रदूषण स्ट्रेस किंवा कोणत्याही कारणाने जर त्वचेवरील ग्लो गायब झाला असेल तर तुम्ही तो ग्लो गाजराच्या फेसपॅकने पुन्हा परत आणू शकता. तसेच याने त्वचेला अनेक पोषक तत्व मिळतात ज्यामुळे त्वचेच्या समस्याही टाळता येतात.
कसा कराल तयार ?
- गाजराचा फेसपॅक तयार करण्यासाठी आधी गाजर चांगले स्वच्छ धुवावे आणि बारीक करावे. हा गाजराचा किस तुम्ही चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा.
- गाजराचा किस करून त्यात एक चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मध आणि एक चमचा गुलाबजल तसेच अर्धा चमचा मलाई मिश्रित करून फेसपॅक तयार करू शकता.
- हा फेसपॅक तुम्ही चांगल्या प्रकारे चेहऱ्यावर आणि मानेवर लावावा. २० मिनिटे हा फेसपॅक तसाच राहू द्या.
- २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहऱ्या-मान स्वच्छ करा. नंतर कॉटनच्या मदतीने चेहरा चांगला साफ करा.
- आता कॉटन गुलाबजलमध्ये भिजवून त्याने त्वचा स्वच्छ करा. जेव्हा गुलाबजल सुकेल तेव्हा नेहमी वापरता ती क्रीम लावा.
- हिवाळ्यात तुम्ही आठवड्यातून ४ वेळा हा फेसपॅक वापरू शकता. दोन आठवड्यांनी चेहऱ्यावर एक गुलाबी रंग दिसेल तर बघून तुम्हीही खूश व्हाल.
आणखी होणारे फायदे
गाजराच्या फेसपॅकने ऑयली स्कीनवरील अतिरिक्त ऑइल शोषलं जातं. फक्त यात मलाई मिश्रित करू नका. मध आणि गुलाबजलच वापरा. याने ड्राय स्कीन मुलायम होईल. तसेच चेहरा तजेलदारही दिसेल.
दूर होतील डार्क सर्कल
गाजराचा फेसपॅक वापरून तुम्ही डोळ्याखाली आलेले डार्क सर्कलही दूर करू शकता. हा फेसपॅक डोळ्याखाली लावून आणि काही वेळ राहू द्या. नियमित हा उपाय कराल तर डार्क सर्कल दूर होतील.