शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चमकदार त्वचेसाठी वापरा बेसनाचे 'हे' 2 फेसपॅक; जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 18:14 IST

जेव्हा त्वचेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती उपायांबाबत सांगितलं जातं. तेव्हा सर्वात आधी बेसनचा पर्याय सुचवण्यात येतो. बेसनामध्ये अनेक अशी तत्व असतात, जी त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी मदत करतात.

जेव्हा त्वचेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती उपायांबाबत सांगितलं जातं. तेव्हा सर्वात आधी बेसनचा पर्याय सुचवण्यात येतो. बेसनामध्ये अनेक अशी तत्व असतात, जी त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेलं झिंक पिंपल्स आणि अॅक्ने दूर करतात. स्किन टॅन झाली असेल तर त्यासाठीही बेसन फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त हे त्वचेचा रंग उजळवण्यासोबतच त्वचा चमकदार करण्यासाठीही मदत करतं. 

आज आम्ही तुम्हाला बेसनापासून तयार करण्यात येणाऱ्या अशा फेसपॅक्सबाबत सांगणार आहोत, जे त्वचा चमकदार करण्यासोबतच रंग उजळवण्यासाठीही मदत करतात. 

बेसन, दूध आणि लिंबाचा पॅक - यासाठी 3 ते 4 चमचे बेसन घ्या आणि त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस आणि 2-3 चमचे कच्चं दूध एकत्र करा. - आता सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि क्लिंजरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. - आता तयार फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास असचं राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत फेसपॅक काढून टाका. - त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. - या फेसपॅकमध्ये कच्च्या दूधाऐवजी दूधाची मलईही वापरू शकता. बेसन ड्राय स्किनसाठी उत्तम पर्याय ठरतो. त्यासाठी तुम्ही बेसनमध्ये केळ एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता.

 बेसन आणि हळदीचा फेसपॅक 

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी बेसन आणि हळदीचा फेसपॅकही तयार करून लावू शकता. हळद आणि बेसनासोबत थोडसं चंदन आणि 3 ते 4 थेंब गुलाब पाणी एकत्र करून मिक्स करू शकता. आता हे चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि त्यानंतर एक तासाने धुवून टाका.         टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स