Beauty : असे बनवा ओठांना नैसर्गिक गुलाबी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST
असे काही घरगुती उपाय आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे ओठ सुंदर आणि आकर्षक बनवता येतील.
Beauty : असे बनवा ओठांना नैसर्गिक गुलाबी !
आपल्या चेहऱ्याचे खरे सौंदर्य हे ओठांवर अवलंबुन असते. चेहऱ्याची ठेवण चांगली आहे मात्र ओठ गुलाबी नसतील तर चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. आपले सौंदर्य टिकविण्यासाठी सेलिब्रिटीदेखील आपल्या ओठांची काळजी घेत असतात. विशेषत: बऱ्याच अभिनेत्रींनी तर सौंदर्यासाठी ओठांची शस्त्रक्रियादेखील केली आहे. चेहऱ्यावरील सर्वात सुंदर भाग म्हणजे ओठ आहेत. महिला आपल्या ओठांना सुंदर बनविण्यासाठी लिप्स्टिक, मॉइश्चरायजर आणि इतरही काही वस्तूंचा वापर करतात. मात्र, अनेकदा असे समोर आलं आहे की, ओठांना लिप्स्टिक किंवा इतर काही वस्तूंचा वापर केल्याने ओठ काळे पडतात तसेच ओठ फाटतातही. पण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे ओठ सुंदर आणि आकर्षक बनवता येतील.बहुतांश तरुणींना सुंदर ओठ हवे असतात, कारण आपल्याला सुंदर आणि आकर्षक बनविण्यात गुलाबी ओठ फार महत्वाची भूमिका असते. सुंदर ओठ महिलांचे सौदर्य खुलवतात. कोणत्याही व्यक्तीचं बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरुनही ठरत असतं. आपले ओठ हे सुंदर असावेत असे प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या ओठांना सुंदर बनवू शकाल.* दही आणि एलोवेरागुलाबी आणि कोमल ओठांसाठी दही आणि एलोवेराची पेस्ट खूपच उपयोगी ठरते. * लिंबू आणि मधाची पेस्ट लिंबामध्ये प्राकृतिक गुण असतात जे ओठांवरील काळे डाग दूर करतात. यासाठी १ चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबूचा रस घ्यावा. त्यानंतर दोघांचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून ते ओठांवर लावावे. * गुलाबाच्या पाकळ्या ओठांवरील काळेपण दूर करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या खूपच फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा नियमित वापर केल्यास ओठांचा रंग हल्का गुलाबी आणि चमकदार होतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर दूधात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या ओठांवर लावाव्यात. मग, सुकल्यानंतर ओठांना धूवावे. * काळे मिरे काळ्या मिऱ्याची पूड पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जवळपास पाच ते दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ओठ पाण्याने धूवा. Also Read : Beauty Tips : अवघ्या दोन दिवसात ओठ होतील गुलाबी, ट्राय करा हे घरगुती उपाय !