BEAUTY : घरगुती उपायांनी क्लिनअप करून दिसा सुंदर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST
स्किन एक्सपर्टच्या मते, घरच्या घरी क्लिनअप करून आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकतो. यासाठी खालील टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील.
BEAUTY : घरगुती उपायांनी क्लिनअप करून दिसा सुंदर !
सुंदर चेहरा ही जणू सेलिब्रिटींची ओळखच असते. चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी बहुतेक अभिनेत्र्या पार्लरचा आधार घेतात, मात्र काहीजण वेळेअभावी घरगुती उपायांना प्राधान्य देतात. आजच्या तरुणाही सेलेब्सचे अनुकरण करुन पार्लरमध्ये आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाया घालवितात. जर आपल्याजवळही वेळेचा अभाव असेल आणि पैसे वाचवायचे असतील तर घरगुती उपायांद्वारे आपण आपल्या स्किनची काळजी घेऊन सुंदर दिसू शकतात. स्किन एक्सपर्टच्या मते, घरच्या घरी क्लिनअप करून आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकतो. यासाठी खालील टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील.* चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार योग्य फेस वॉश किंवा क्लिन्झरची निवड करुन चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा शक्यतो कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर टोनर लावा. * चेहऱ्यावरील सूक्ष्म छिद्र बुजवण्यासाठी क्लिन्झिंग मिल्क कापसाच्या बोळ्यावर घेऊन चेहरा साफ करा. सहन होईल एवढी वाफ घ्या. यानंतर चेहरा थंड करण्यासाठी बफार्ने मसाज करा. हा मसाज गोलाकार दिशेने करा. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते.* आपल्या त्वचेनुसार योग्य फेस स्क्रबर निवडा. फेस स्क्रबरने ८-१० मिनिटे चेहरा साफ करा. स्क्रबर चेहऱ्यावर थोडा सुकल्यानंतर, मध लावा. यामुळे मुरुमाचे प्रमाण कमी होते व त्वचा उजळते.* चेहरा स्वच्छ धुवून आवडीनुसार फेसपॅक लावा. फेसपॅक पूर्ण सुकल्यावर चेहरा धुवून टाका. हळूहळू चेहरा सुकू द्या. त्यानंतर टोनर लावा, चेहऱ्याला तजेला येण्यासाठी मॉइश्चरायझर लावा. Also Read : Beauty : सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय ! : Beauty Tips : त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !