‘वॅक्सिंग’च्या वेदना टाळण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 15:43 IST
महिला पार्लरमध्ये जाऊन हॉट वॅक्सच्या साह्याने शरीरावरील हातापायांचे अनावश्यक केस काढतात. यावेळी खूपच वेदना होतात. त्यामुळे वॅक्स कधीच करू नये असे वाटते.
‘वॅक्सिंग’च्या वेदना टाळण्यासाठी !
-Ravindra Moreशरीराचे सौंदर्य टिकविण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जाऊन हॉट वॅक्सच्या साह्याने शरीरावरील हातापायांचे अनावश्यक केस काढतात. यावेळी खूपच वेदना होतात. त्यामुळे वॅक्स कधीच करू नये असे वाटते. मात्र वॅक्सिंग करणे गरजेचे असते. मात्र, वॅक्सिंग करताना होणाऱ्या या वेदना कमी करता आल्या तर... असा विचार जर आपण करत असाल तर खालील टिप्स अवश्य फॉलो करा. * ठराविक काळात वॅक्सिंग करणे टाळापीरियड्सच्या अगोदर किंवा त्या काळात शरीरात काही बदल होत असल्याने त्यावेळी बॉडी खूप सेंसिटिव्ह होते यासाठी त्यावेळी वॅक्सिंग करु नका. * गरम पाणी टाळावॅक्सिंग नंतर स्किन खूप सेंसिटिव्ह होते आणि बॅक्टेरियल इंफेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात. यामुळे यानंतर अंघोळीसाठी गरम पाणी टाळा. शिवाय स्किन लवकर बरी होण्यासाठी तुमच्या स्किनला आॅक्सिजन मिळू द्या. * मॉश्चराइज करावॅक्सिंगमुळे तुमची मृत त्वचा आणि अनावश्यक केस निघून जातात. मात्र, यामुळे त्वचेला खूप वेदना सहन कराव्या लागतात. यामुळे वॅक्सिंग करण्याअगोदर ‘एसपीएफ सन ब्लॉक’ क्रीम लावा जर तुमची स्किन सेंसिटटीव्ह असेल तर अॅलोवेरा जेलचा वापर करा.* योग्य कपड्यांची निवडशक्यतो वॅक्सिंग केल्यानंतर टाइट कपडे टाळा. कारण टाइट कपड्यांमुळे तुमची त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही, यामुळे वॅक्सिंग नंतर फिटेड आणि स्किन-टाइट फॅब्रिक्स घालू नका. मोकळे आणि लूज कपडे घाला.* वर्कआउट टाळाएक्सरसाइज केल्याने जास्त घाम निघतो, ज्यामुळे तुमची मुलायम आणि सेंसटिव्ह स्किनवर बॅक्टेरीया खूप जलद पसरतात. यामुळे काही वेळासाठी वर्कआउट टाळा.* अगोदर एक्सफोलिएट कराएक प्यूमिस स्टोन घ्या आणि आपल्या बॉडीला स्क्रब करा. तुम्ही बॉडी स्क्रबरचा वापर देखील करु शकता. एक्सफोलिएशन केसांना सहज निघण्यास मदत करेल. परंतु कधीही वॅक्सिंग नंतर एक्सफोलिएट करु नका. यामुळे अॅलर्जी होऊ शकते.* उन्हापासून बचाववॅक्सिंग आधी आणि नंतर स्किन झाकून ठेवा. सनबर्न स्किनवर वॅक्सिंग केल्याने जास्त वेदना होतात आणि खाज येण्याची समस्या होते. यामुळे हे करण्याअगोदर आणि नंतर सनस्क्रीन लावणे विसरु नका.* बर्फ नको...वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सिंग करण्याच्या ठिकाणी बर्फ लावू नका. हे तुमच्या पोर्सला बंद करते ज्यामुळे वॅक्सिंग करतांना जास्त त्रास होतो. हे वॅक्सिंग केल्यानंतर लावा कारण स्किनच्या पोर्स बंद होतील आणि थंड वाटेल.* सेंसिटिव्ह स्किनजर वॅक्सिंग नंतर तुमची त्वचा लाल होत असेल तर या टिप्सला नक्की फॉलो करा. याव्यतिरिक्त तुम्ही वॅक्सिंगच्या एक तास अगोदर अँटी-इंफ्लेमेटरी पिलसुध्दा घेऊ शकता किंवा वॅक्सिंगच्या 45 मिनिट अगोदर रबिंग क्रीम लावा.