शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! आंघोळीच्या पाण्यात टाका चिमुटभर तुरटी, फायदे इतके तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 15:13 IST

Bathing With Alum Water : तुम्हीही ऐकलं असेल की, बरेच लोक आंघोळीच्या पाण्यावर तुरटी फिरवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे फायदे काय होतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Bathing With Alum Water : तुरटीचा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून वापर केला जातो. तुरटी ही एक नॅचरल बाब आहे. शेविंग केल्यानंतर किंवा दाढी करताना कापलं गेलं तर तुरटी लावली जाते. तसेच तुरटीचे इतरही अनेक फायदे होतात. अशात तुम्हीही ऐकलं असेल की, बरेच लोक आंघोळीच्या पाण्यावर तुरटी फिरवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे फायदे काय होतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

थकवा आणि वेदना होईल दूर

आंघोळीच्या पाण्यात जर तुरटी फिरवली आणि या पाण्याने  आंघोळ केली तर दिवसभराचा थकवा, शरीरावरील धूळ-माती दूर होते. तसेच या पाण्याने मांसपेशींना आरामही मिळतो. जर तुम्ही एखाद्या फिजिकल अॅक्टिविटीनंतर थकलेले असाल तर तुरटीच्या पाण्याने आंघोळ करा. तसेच तुरटी टाकलेल्या गरम पाण्यात पाय ठेवून बसल्याने पायांची वेदनाही कमी होते.

केस, त्वचा, दातांसाठी फायदेशीर

तुरटी केस, त्वचा आणि दातांसाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवली तर शरीराची दुर्गंधी, शरीरावरील घाण दूर होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी सकाळी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. इतकंच नाही तर तुरटीच्या पाण्याने त्वचेची मालिश करा. सुरकुत्या गायब होतील.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

एक्सपर्ट्सनुसार, तुरटीच्या पाण्याने सांधेदुखी दूर होते आणि नसाही मोकळ्या होतात. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरावावी.

यूरिन इन्फेक्शन होईल दूर

महिलांना नेहमीच यूरिन इन्फेक्शनची समस्या होत असते. अशात दिवसातून दोन वेळा तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केले तर फायदा मिळेल.

जास्त येणारा घाम होईल कमी

काही लोकांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो. पण हिवाळ्यातही काहींना घाम येतो. अशात तुरटी घामाला कंट्रोल करू शकते. ज्यांना जास्त घाम येतो त्यांना तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ करावी.

सूज होईल कमी

तुरटीमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात जे शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात. तसेच पिंपल्ससाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया तुरटीमुळे नष्ट होतात. तुरटी लावल्याने त्वचेची जळजळ कमी होते. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स