शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 13:09 IST

Alum Benefits : तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Alum Benefits : तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच कल्पना नसेल. तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुरटीचे फायदे

नॅचरल आफ्टर शेव

शेविंग केल्यानंतर तुम्ही तुरटीचा वापर आफ्टर शेव म्हणून करू शकता. दाढी करताना झालेली जखम याने लगेच भरून निघते आणि त्वचाही चांगली होते.

नॅचरल टोनर, सूज कमी करतं

तुरटी त्वचेला टोन करण्याचं काम करते. याने त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे चेहराही स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागतो. बाजारातील केमिकल्सयुक्त टोनरचा वापर करण्याऐवजी तुरटी कधीही बेस्ट ठरते. कारण याने काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. तसेच याने चेहऱ्यावरील सूज आणि पुरळही दूर होते.

तोंडातील फोडंही दूर होतात

माऊथ अल्सर म्हणजे अनेकदा लोकांना तोंडात फोडं येतात. ही फोडं दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. फोडावर तुरटीचं थोडं पावडर काही सेकंदासाठी लावून ठेवा, नंतर पाण्याने गुरळा करा. दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यावर तुम्हाला आराम मिळेल. 

तोंडाची दुर्गंधी

तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना असते. अशात चिमुटभर तुरटी पावडर आणि काळं मीठ एक ग्लास पाण्यात टाका. या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

डार्क सर्कल

झोप पूर्ण न झाल्याने अनेकदा डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी थोडं तुरटी पावडर पाण्यात मिक्स करू डागांवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. डार्क सर्कल कमी झालेले दिसतील.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स